चित्रा न्युज प्रतिनिधी
गडचिरोली :भाजपा युवा मोर्चा गडचिरोली जिल्हाध्यक्ष अनिलभाऊ तिडके यांच्या आई स्व. पुष्पा तुकाराम तिडके यांचं काल (२८ मे) रोजी दुःखद निधन झालं. त्यांच्या निधनाने तिडके कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.
स्व. पुष्पाताईंनी आपलं संपूर्ण आयुष्य कुटुंबासाठी समर्पित केलं. त्यांचं व्यक्तिमत्त्व सुसंस्कारित, साधं आणि संघर्षशील होतं. त्यांच्या आठवणी कायम प्रेरणादायी राहतील.
त्यांच्या अंत्यविधीस कठाणी नदीच्या घाटावर शोकमग्न वातावरणात पार पडले. यावेळी भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ. अशोक नेते यांनी उपस्थित राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली व तिडके कुटुंबियांचं सांत्वन केलं.
यावेळी अनेक भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि ग्रामस्थांनी अंतिम दर्शनासाठी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली.
0 टिप्पण्या