चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय , राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला. हा कार्यक्रम प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय राजयोग अनुभूती केंद्र खोकराला खात रोड भंडारा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला ब्रह्माकुमारी च्या वरिष्ठ मा.सिस्टर शोभा दीदी खोकरला सेंटरच्या प्रमुख प्रशासिका मा.रक्षा दीदी, सिस्टर शालिनी दीदी,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत संघटक मा. श्री अतुलची दिवाकर ,अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे पश्चिम क्षेत्र संघटन मंत्री मा. श्री नितीनजी काकडे आणि विदर्भ प्रांत पर्यावरण आयाम प्रमुख मा.श्री संजय आयलवार आणि संघ आणि संघटनेचे इतर मान्यवर आणि ग्रीन हेरिटेज पर्यावरण फाउंडेशन चे संस्थापक_ अध्यक्ष .मोहम्मद सईद शेख , पेस हॉस्पीटल नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यानी, तसेच ग्रामपंचायत खोकरल्याच्या मा.सरपंच सौ. वैशाली ताई सारवे आणि ग्राम विकास अधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. सिस्टर शालिनी दिदी हे यांनी केले ,तर बैठक आणि इतर संपूर्ण व्यवस्था बिके गौरीभाई , सर्व बीके भाई आणि सिस्टर्स यांनी सांभाळले.
सुरूवातीला सर्व मान्यवरांनी पर्यावरण रक्षण व जतन आणि प्लास्टिक बंदी तसेच जलसंवर्धन यावर मार्गदर्शन केले. श्रीआयलवार यांनी पर्यावरण रक्षण करण्यासाठी उपस्थित यांच्याकडून संकल्प करून घेतला.
त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .
वृक्षारोपण झाल्यानंतर ब्रम्हाकुमारीच केंद्रातर्फे उपस्थित सर्वांना प्रसादाचे वितरण करण्यात आले.
हा कार्यक्रम आध्यात्मिक आणि आल्हादायक वातावरणात उत्तम प्रकारे साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संपर्कप्रमुख माननीय श्री सुधीर जोशी तसेच विज्ञान भारती जिल्हा समन्वयक मा.डॉ. श्री राजेंद्र शहा,अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा भंडाराचे मार्गदर्शक प्रा.श्री प्रेमराज मोहकर, अनिल शेंडे, रवींद्र तायडे, डॉ . प्रा.जयश्री सातोकर ,राजेश पांडे, डॉ . प्रा.अनिता महाजन ,चंद्रशेखर साठे, श्री किसनजी शेंडे ,रमेश पारधी व अन्य कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.
0 टिप्पण्या