Ticker

6/recent/ticker-posts

मुंबई महापलिकेसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीच्या चार ही पक्षांनी एकत्र लढाव्यात - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकित  रिपब्लिकन पक्षाला जागा सोडाव्यात - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले 

चित्रा न्युज प्रतिनिधी 
मुंबई  -  आगामी मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील जिल्हा परिषदा सह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीमधील भाजप,शिवसेना,राष्ट्रवादी आणि रिपब्लिकन पक्ष या चार ही पक्षांनी एकजुटीने महायुती म्हणुन लढाव्यात.तसेच सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाला योग्य प्रमाणात जागा सोडाव्यात अशी मागणी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना .रामदास आठवले यांनी केली असल्याची माहिती  रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत  देण्यात आली.
मुंबई मराठी पत्रकार संघात आज रिपब्लिकन पक्षाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर ;राज्य सरचिटणीस गौतम सोनावणे,मुंबई प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ कासारे,रिपब्लिकन पक्षाचे सचिव सुरेश बारशिंगे, विजय सोनवणे,श्रीकांत भालेराव विवेक पवार प्रकाश जाधव  सोना कांबळे आदि नेते उपस्थीत होते.

पाकिस्तानपुरस्कृत आतंकवाद नेस्तनाबूत करण्यासाठी भारताने केलेल्या सिन्दुर ऑपरेशनचा विजय उत्सव साजरा करून भारतीय सैन्य दलाचा अभिमान व्यक्त करण्यासाठी मुत्सद्दी नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचेही अभिनंदन करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने देशभरात भारत जिंदाबाद यात्रा करण्याचे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी रिपब्लिकन कार्यकर्त्यांना केले.त्या आवाहनास देशभरात उदंड प्रतिसाद लाभला असून देशभरात गुजरात तेलंगणा उत्तर प्रदेश आदी राज्यांत आणि महाराष्ट्र मुंबई ; छत्रपती संभाजी नगर; कोल्हापूर;पुणे; सोलापूर ; लातूर  सांगली यासह अनेक जिल्ह्यांमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या भारत जिंदाबाद यात्रेत नागरिकांनी तिरंगा झेंडा घेऊन सामील होत मोठा प्रतिसाद दिला अशी माहिती आज रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.

*रिपब्लिकन सेने चे ज्येष्ठ नेते काकासाहेब खंबाळकर यांचा रिपब्लिकन पक्षात प्रवेश* 

यावेळी रिपब्लिकन सेनेचे ज्येष्ठ नेते काकासाहेब खंबाळकर यांनी रिपब्लिकन सेनेचा राजिनामा देऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) पक्षात प्रवेश

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या