Ticker

6/recent/ticker-posts

दारेफळ येथे पेयजल व स्वच्छता विभाग नवी दिल्ली येथील पथकाने केली स्वच्छता कामाची पाहणी

 श्रीकांत बारहाते जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण हिंगोली
  
हिंगोली :-वसमत तालुक्यातील दारेफळ येथे केद्र शासनाच्या जल शक्ती मंत्रालयाचा पथकाच्या वतीने दिनांक 06 जून रोजी वसमत तालुक्यातील दारेफळ येथील स्वच्छता कामाची पाहणी करण्यात आली व ग्रामस्थाना स्वच्छता विषयी माहिती व मार्गदर्शन करण्यात आले पाहणी दरम्यान वैयक्तिक शौचालय सांडपाणी व्यवस्थापन घनकचरा व्यवस्थापन प्लास्टिक कचरा व्यवस्थापन कचरा वर्गीकरण शालेय स्वच्छता अंगणवाडी स्वच्छता आदीची पडताळणी करण्यात आली केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान टप्पा 2 अंतर्गत करण्यात आलेल्या कामाची काही दिवसातच एस एस जी   2025 ची अंमलबजावणी करण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्यातून हिंगोली जिल्ह्यातील दोन गावांची निवड करण्यात आली होती त्यात दारेफळ गावाचा समावेश होता या पथकाने स्वच्छता विषयक तपासणी करून केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले या पथकात जल शक्ती मंत्रालयाचा वतीने सेक्शन अधिकारी मा. श्री नितीन वर्मा यांच्या सह पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री यु डी तोटावाड सह गट विकास अधिकारी सुनील अंभुरे गटशिक्षणाधिकारी काष्टे अकादमी चे राज्य समन्वयक रणजीत राजपूत केतन फिरके श्रीजीत सोळंके शुभम माने यांची उपस्थिती होती यावेळी विस्तार अधिकारी टि एल कोकरे छत्रपती चव्हाण माधव सुर्यवंशी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील रघुनाथ कोरडे शामसुंदर मस्के विष्णू मेहेत्रे गट समन्वयक बि सी खंदारे दादाराव अहिरे रविकुमार खिराडे सरपंच सुनीता गोपीनाथ खरबडे उप सरपंच गोदावरी शिवाजी भालेराव ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती सत्वधर दुधाटे राजाभाऊ भालेराव नवनाथ भालेराव सुरेश भालेराव नामदेव भुजबळ संदिप ठाकुर रामप्रसाद भालेराव प्रल्हाद चांभारे हनुमान भालेराव शिवाजी पांचाळ हेमराज भालेराव उद्धव भालेराव यांच्यासह अंगणवाडी सेविका मदतनीस जलसुरक्षक आशा स्वयंसेविका या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गट समन्वयक बि सी खंदारे यांनी केले या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या