चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर :-आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार सोहळा संपन्न होणार_
*LIC विमा प्रतिनिधी सागर उरवणे यांची माहिती*
विमा क्षेत्रातील अग्रगण्य संस्था भारतीय आयुर्विमा महामंडळ LIC यांचा बिमा ग्राम पुरस्कार ग्रामपंचायत सदाशिवनगर ला नुकताच जाहीर झाला आहे. गावातील लोकांना विम्याचे महत्त्व पटवून देऊन मागील आर्थिक वर्षात सदाशिवनगर या गावातून सुमारे 125 लोकांना विम्याचे छत्र प्रदान करण्यात आले. गेल्या दोन वर्षापासून हा पुरस्कार सदाशिवनगर ग्रामपंचायतला मिळत आहे. लवकरच या पुस्तकाराचे वितरण माननीय आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व माननीय खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
गावच्या विकासासाठी
*एक लाख रुपये बक्षीस* आणि *बिमा ग्राम पुरस्कार* असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारासाठी विकास अधिकारी शशिकांत निकम साहेब, तसेच अनोकार साहेब, आणि पंढरपूर शाखेचे शाखाधिकारी श्री गुळवणी साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले
0 टिप्पण्या