Ticker

6/recent/ticker-posts

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण

"जागतिक पातळीवर विचार करा, स्थानिक पातळीवर कृती करा."

चित्रा न्युज प्रतिनिधी 
यवतमाळ :-स्व. मधुकरराव भगत शहरी व ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था, बेलोरा ता.पुसद जि. यवतमाळ या संस्थेने जागतिक पर्यावरण दिना चे औचित्य साधून अनमोल सिटी भाग 6, पुसद मध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष रोपण केले.
जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी ५ जून रोजी साजरा केला जातो, आणि त्याचे मुख्य फायदे म्हणजे पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढवणे, प्रदूषण कमी करणे, आणि नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करणे. हा दिवस मानवांना पर्यावरणाचे महत्त्व आणि त्याचे आपल्या जीवनावरील परिणाम याबद्दल जाणीव करून देतो.
पृथ्वी आपले घर आहे आपण जन्माला आल्यापासून ते मरणापर्यंत ही पृथ्वी आपले संगोपन करते. निसर्ग पोषक प्रेमळ आणि आलिंगन देणारा आहे हे आपल्याला जगण्यासाठी आणि आपल्या कल्याणासाठी आवश्यक असलेली सर्व संशोधने प्रदान करते शारीरिक आणि मानसिक, निरोगी पणासाठी निसर्ग आपल्याला प्रत्येक गोष्टी सर्वोत्तम प्रदान करण्यासाठी परिपूर्ण आहे. मात्र मानव जातीने निसर्गावर निर्दयीपणा दाखवला आहे मानवाने नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास केला आहे. आता वेळ आली आहे की आपण निसर्गाकडे वळावे आणि त्याचे जतन करण्यास सुरुवात करावी  आणि जैवविविधता ऱ्हास याशिवाय जनजागृती करण्यासाठी दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. आपण जागरूक असणे आवश्यक आहे.
जागतिक पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करणारे हे एक जागतिक व्यासपीठ आहे. यामध्ये दरवर्षी १४३ हून अधिक देशांचा सहभाग असतो. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी या दिवशी वेगवेगळे पर्यावरणविषयक जागरूकता आणि कृती कार्यक्रम आयोजित केले जातात. जागतिक पर्यावरण दिवस या दिवशी त्या गोष्टींबद्दल जागरूक केले जाते. ज्यांचा जगावर आणि पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होतो. हा दिवस पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्याच्या आपल्या जबाबदारीची आपल्याला जाणीव आणि दृष्टिकोन देतो.
तसेच संस्थेचे अध्यक्ष राजकुमार भगत यांनी मार्गदर्शन करताना असे सांगितले की, निरोगी जीवनात आणि पृथ्वीवरील जीवनाच्या अस्तित्वामध्ये पर्यावरण महत्त्वाची भूमिका बजावतो पृथ्वी ही विविध सजीव प्रजातीचे घर आहे आणि आपण सर्व अन्न हवा पाणी आणि इतर गरजांसाठी पर्यावरणावर अवलंबून आहोत म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने आपल्या पर्यावरणाचे रक्षण आणि संरक्षण करणे महत्त्वाचे आहे.
पृथ्वीवरील अथवा पृथ्वीच्या कोणत्याही प्रदेशातील मानव तसेच इतर सजीव ज्या परिसरात राहतात, त्या परिसरातील सर्व घटकसमूह मिळून तयार झालेली परिस्थिती म्हणजे पर्यावरण होय. पर्यावरणात तापमान, सूर्यप्रकाश, जल, वातावरण इत्यादी अजैविक घटकांबरोबरच वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव इत्यादी जैविक घटकदेखील असतात. 
असे सांगून पर्यावरणावर जनजागृती करून नागरिकांना मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करा असे सांगितले.
या जागतिक पर्यावरण दिन या कार्यक्रमामध्ये स्व मधुकरराव भगत शहरी व ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था, बेलोरा ता.पुसद जि. यवतमाळ 
या संस्थेचे अध्यक्ष राजकुमार भगत, रविभाऊ देशपांडे तरुण भारत पुसद जिल्हा प्रतिनिधी, मिलिंद कांबळे साहेब स्वप्नपूर्ती इंजिनियर, विलास पाचंगे साहेब तलाठी उमरखेड, मनोज भाऊ गादेकर सामाजिक कार्यकर्ते, 
विलास पवार साहेब, रमेश इंदाने, आदी. कार्यक्रमास उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या