Ticker

6/recent/ticker-posts

हायवा ट्रकने रेती तस्करी करणाऱ्या आरोपीस भद्रावती पोलिसांची कारवाही


हायवासह ४.७५ लाख रुपयांचा माल जप्त .


चित्रा न्युज प्रतिनिधी 
 भद्रावती :- चंद्रपुर जिल्ह्यात अध्याप रेती घाटाचे लिलाव झालेले नसताना अवैद्य रेतीची वाहतूक रात्र दिवस सुरू आहे.
भद्रावती पोलिसांनी हायवा ट्रक क्रमांक एमएच ३४ एम ६३४९ चा चालक प्रवीण सदुजी अमृतकर, रा. बाबुपेठ चंद्रपुर यांना सुमठाणा येथून वाळू चोरी करताना रंगेहाथ पकडले. पोलिसांनी हायवा ट्रकसह ४.७५ लाख रुपयांचा माल जप्त केला आहे.

 दिनांक . o४/०६/२५ रोजी रात्र गस्त दरम्यान पहाटे ०३-३० ते ०४ वाजता दरम्यान पोलिस उपनिरीक्षक प्रियंका गेडाम सोबत पोलिस अंमलदार हरिश्चंद्र नन्नावरे, ड्रायवर पोलिस हवालदार जगदीश जीवतोडे असे सरकारी वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना विश्वकर्मा मंगल कार्यालय जवळ,सुमठाणा भद्रावती येथे एक हायवा रेती भरलेलाट्रक क्रमांक एम एच. ३४.एम. ६३४९ हा रेती खाली करीत असतांना दिसला तेव्हा सदर ट्रक चालकास थांबवून खाली केलेल्या रेती बाबत विचारले असताचालक याने उडवाउडवीची उत्तरे दिली व रॉयल्टीचे कागदपत्राबाबत विचारले असता कोणतीही वैध कागदपत्रे नसल्याचे सांगितले... सदरची रेती ही अवैधरित्या वाहतूक करतांना मिळून आल्याने हायवा ट्रक क्रमांक एम एच. एम. ६३४९ चे चालक आरोपी नाम प्रवीण सदुजी अमृतकर, वय ३५ वर्षे, रा. बाबूपेठ, चंद्रपूर यांचे विरुध पो स्टे भद्रावती येथे रेती चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत चालक प्रवीण सदूजी अमृतकर (३५) यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, हिवा ट्रक बाबुपेठ येथील रहिवासी निशांत आंबटकर यांचा आहे. तो त्यानें भाड्याने घेतला होता. बांधकाम कामासाठी चंद्रपूरच्या इराई नदीतून वाळू आणून विश्वकर्मा सभागार सुमठाणा येथे टाकण्याचे त्यांना सांगण्यात आले आहे.

रेतीच्या अवैद्य तस्करी करणाऱ्या मूळ मालकास भद्रावती पोलीस कारवाई करणार काय असा सवाल नागरिक करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या