Ticker

6/recent/ticker-posts

हाळी-हंडरगुळीच्या बसस्थानकात महिला प्रवाशांची सुरक्षा रामजाने..!


चित्रा न्युज प्रतिनिधी 
हंडरगुळी :-उदगीर शहरानंतर तालुक्यात सर्वात मोठे व राज्यमार्गावर गाव असलेल्या हाळी-हंडरगुळी येथील बसस्थानका मधून रोज शेकडो महिला-भगीनी ये, जा करतात.माञ,त्यांच्या सुरक्षेच्या द्रष्टीने अत्यावश्यक असलेल्यांपैकी एकही सुविधा येथील बसस्थानकात दिसत नाही.म्हणुन महिला प्रवाशांची सुरक्षा करणार कोण व कधी ? हे रामजाने..!
कारण,याबाबत अनेकदा पेपरबाजी करुनही याकडे मरा.माप.महामंडळ जाणुन-बुजून दुर्लक्ष करत असल्याचे दिसते.यामुळे या बसस्थानकामधून ये-जा करणा-या महिला,भगीनींसह शाळा,महाविद्यालयीन विद्यार्थिनी असुरक्षित आहेत.कारण,सकाळी ९ ते १० पर्यंत येथे कार्यरत असलेला कर्मचारी ड्यूटीवर येत नाही.माञ, महिलांसह शाळा,काॅलेजला जाणारे मुली सकाळी सकाळी बसस्थानका मध्ये येतात.तसे कांही सडकछाप पोरं ही येतात.तर कांही सडकछाप पोरं जोरजोरात हाॅर्न वाजवित गाड्या पळवितात.आणि मानसिक ञास देतात.असे बसस्थानकासमोरील हाॅटेलवरुन पाहणा-यांमध्ये बोलले जाते.
हाळी-हंडरगुळीच्या बसस्थानकातून उदगीर-शिरुरताजबंद-अहमदपुर या ठिकाणी शिक्षणासाठी रोज शेकडो मुली ये-जा करतात.माञ,येथील बस स्थानकात जसे अन्य समस्या आहेत. तशी किंबहूना त्या समस्यापेक्षाही महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न हा अतिगंभीर बनत चालला आहे.तरीही याकडे लक्ष आणि भेट द्यायला एस. टी.महामंडळाच्या अधिका-याला वेळ मिळत नसल्याने महिलांची सुरक्षा धोक्यात आली असून एखादी दुर्देवी घटना घडल्यावरच येथील बस स्थानकात सुरक्षेसंबंधिच्या सुविधा (उदा:पोलिस,सी.सी.टी.व्ही.कॅमेरे) उप्लब्ध होतील का?तसेच महिला प्रवाशांना एस.टी.खाते सुरक्षा पुरवू शकत नसेल तर हे बसस्थानक हवेच कशाला?असे सवाल या गावातील जाणकारातुन विचारला जात आहे.
या बसस्थानकातुन ये-जा करणा-या प्रवाशांना सडकछाप टोळक्यांच्या दहशतीच्या सावटाखाली ये-जा करावे लागते.आणि या बसस्थानका मधील सगळा प्रकार अनेकदा पेपर मधून उघड करुनही एस.टी.खात्याचे संबंधित कानाडोळा व ढोंगीपणा करत असून त्या अधिका-याचे असे वागणे म्हणजे सडकछाप टोळ्यांना अप्रत्यक्षपणे पाठींबाच देतात.असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

हाळीच्या बसस्थानकात महिलांच्या सुरक्षेसाठी कोणतीच योजना नाही. तसेच येथील कर्मचारी कधीही येतो नी जातो.म्हणुन येथे कर्तव्य कठोर कर्मचा-याची नेमणुक करावी.आणि सी.सी.टी.व्ही बसवावेत.
एक संतप्त पालक,हाळी

या बसस्थानकात असलेल्या समस्या व महिला प्रवाशांची सुरक्षा.याबद्दल प्रशासन गंभीर दिसत नाही.म्हणुन मैदानातच घाण करणे,दारु पिणे या सारखे प्रकार घडत असतानाही येथे कार्यरत असलेला कर्मचारी काय करतोय?तसेच वरिष्ठ येथे येऊन या बसस्थानकातील गैरसोयींची पाहणी कधी करतील?
एखादी दुर्देवी घटना घडल्यावर का?
सोहेल टप्पेवाले,युवा कार्यकर्ता
हाळी

माझ्या सारख्या अनेक विद्यार्थिनी या बसस्थानकातून बाहेर गावात शिक्षणासाठी ये-जा करतात.तसेच येथे कार्यरत असलेला महामंडळाचा नोकर हा सकाळी कधीच वेळेवर येईना.माञ,कांही लोफर पोरं रोज येतात.व टाॅंट मारत व कर्णकर्कश हाॅर्न वाजवित गाड्या उडवितात.
एक संतप्त विद्यार्थिनी (भगीनी)
हाळी.
शासन बसस्थानकात स्वच्छता अन् प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विविध सोयी सुविधा उप्लब्ध करुन देते.माञ,या बसस्थानकात ना स्वच्छता आहे.ना पाणी तसेच प्रवाशांच्या सुरक्षेची साधने.तेंव्हा शासनाच्या डायरीत या बसस्थानकाची नोंद आहे का नाही !!
 अय्याज कुरेशी,अध्यक्ष,कुरेशी संघ
हाळी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या