चित्रा न्युज प्रतिनिधी
हंडरगुळी :-गावातील व शेजारच्या गावातील कांहीजण दिवाळी सणांसाठी मोठ मोठ्या महानगरातून स्व घरी आले आहेत.आणि यातील कांही शहरी बाबू दोन व चार चाकी वाहन अगदी धूम स्टाईल कट व कर्णकर्कश हाॅर्न वाजवीत चालवत असल्याने याचा हकनाक ञास हंडरगुळीकरांना होत आहे.तरीही असे बंद होण्याऐवजी वाढतच चालल्याने याचा सामाजिक शांततेवर परिणाम होऊ शकतो..!
कारण,या गावात असे गत कित्येक महिण्यापासून राञंदिवस होताना सामान्य जनतेला दिसतात.परंतू या हाॅर्नबाज व कट मारणा-या बाईक स्वारांवर कारवाई करण्याचे धाडस आजवर कुणीच दाखविले नसलेतरी ही शेकडो अल्पवयीन चालक धूम स्टाईल ३तीन,४चार व्यक्तींना एका मोटारसायकलवर बसवून कट मारत धूम स्टाईल गाडी चालवायचे धाडस राञंदिवस हंडरगुळी गावातील मेन मार्केट सह गल्लीबोळात दाखवतात. लोकसंख्येबरोबरच वाहनांची संख्या पण वाढतच चालली आहे.आणि या मध्ये भर पडलीय ती म्हणजे दिवाळी सणासाठी शहरातून गावात,घरात आलेल्या शहरीबाबूंच्या गाड्यांची.. आणि असे कांही चालक आहेत.जे की स्वत:च्या ताब्यातील गाडी मोठ मोठ्या आवाजात विनाकारण हाॅर्न वाजवत व कटा मारत हिंडताना दिसतात.आणि अशाच एका लहान मुलाने त्याच्या ताब्यातील बाईक धूम स्टाईल कट मारत चालवली असता समोरुन येणा-या मोटारसायकलला कट मारण्याच्या नादात धडकली आणि या धडकेत समोरच्या गाडीवर असलेल्या दोघांना जबर दुखापत झाल्याचा प्रकार परवाच हंडरगुळी च्या महादेव मंदीर रोडवर घडला असून यात एका जख्मीचा गुडघा मोठ्या प्रमाणात दुखावल्याने त्याला ऐन दिवाळीत हजारो रुपयांचा खर्च दवापाण्यासाठी करावा लागला.तरी ही संबंधित यंञणा बघण्याशिवाय कांहीच करत नाही.
हंडरगुळी गावातील रस्ते ऐसपैस व झकपक असल्याने शेजारच्या गावा मधील कांही छपरी पोरं राञंदिवस हकनाक हाॅर्न वाजवत व धूमस्टाईल कटा मारत मोटारसायकल हंडरगुळी मधील गल्लीबोळात मोटारसायकली चालवताना दिसतात.हाॅर्न व फटाका सायलंन्सरच्या आवाजाने कानठळे बसतात.नवजात बालके दचकतात. आणि असा हा ञास आणखी किती दिवस हंडरगुळीकरांना सहन करावा लागणार आहे?
कारण,यावर स्थानिक प्रशासनाने लवकरात लवकर कडक पाऊले नाही उचलले तर मग सामाजिक शांततेचा कधीही ब्लास्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही..!
कारण,शेवटी हंडरगुळीकरांच्या सहनशीलतेला पण कांही सीमा आहेत.अशी कुजबूज ऐकू येत आहे.


0 टिप्पण्या