दिवाळीची धूम संपताच केवायसीची धूम सुरु झाली..
चित्रा न्युज प्रतिनिधी
हंडरगुळी :- मुख्यमंञी माझी लाडकी बहीण या योजनेच्या नव्या नियमानुसार आता लाडक्या बहीणींना ई.केवायसी करा अन्यथा अनुदान विसरा.हा फतवा शासनाचा असल्याने तसेच दिवाळी उत्सवाची धूम संपल्याने आताEkyc करण्याची धूम सुरु झाली आणि ई. केवायसी करण्याची डेडलाईन याच महिण्यात १८ तारखेपर्यंतच आहे. म्हणुन येथील CSC (सेतू) केंद्रावर लाडक्या बहीणींसह भावजींची पण गर्दी अन् पळापळ वाढू लागल्याचे चिञ आहे.शासनाच्या नवनवीन फतव्याच्या न्यूज सर्व माध्यमातून झळकल्याने हाळी हंडरगुळी सह उदगीर तालुक्यातील लाडक्या बहीणींसह भावजी पण आता कस!या चिंतेत व गोंधळामध्ये पडले आणि केवायसी करण्यासाठी धावाधाव करु लागले.
आणि आता ई.केवायसी करण्याचे काउंटडाऊन सुरु झाले आहे.
कारण,३० तारीख ही डेडलाईन. म्हणुन सकाळी सेतू केंद्र उघडण्या अगोदर पासूनच सेतू केंद्रा समोर बहीणींसह भावजी जमू लागलेत.
या योजनेसाठी नवा नियम काढले असल्याने एका घरात अनेक लाभ घेणारे,नोकरदार असलेल्यांना आता अनफीट ठरवून या योजनेचा लाभ न देण्याचा शासन निर्णय आहे.म्हणुन आगामी हप्त्यापासून हाळी व हंडरगुळीतील हजारो लाडक्या बहीणी नावडत्या होणार,म्हणजे या लाभापासून कायमच्याच वंचीत होणार.पण किती?याकडे लक्ष आहे तसेच ईकेवायसीची प्रक्रिया आता जलदगतीने करण्याची आॅर्डर आहे तसेच १८ ही तारीख शेवटची आहे. असे महिला व बालकल्याण मंञी आदिती तटकरे यांनी म्हटले आहे.
वर्क फ्राॅम होम प्रमाणे घरबसल्या करा ई.केवायसी..
लाॅकडाऊन मध्ये वर्क फ्राॅम होम ही सुविधा होती.तशीच सुविधा आता ई.केवायसी बाबतही आहे.
कारण,सेतू केंद्रावर ताटकळण्या पेक्षा आता घरबसल्या मोबाईलवरही ई.केवायसी करता येणार आहे.पण यासाठी गुगल क्रोमवरील संकेत स्थळावर याची माहिती मिळेल..
यात स्वत:सह पतीचा तसेच विवाह न झालेल्या मुलींसाठी वडीलांचा ही आधार नंबर टाकावा लागेल.
विधवा व घटस्फोटीतांमध्ये चुळबूळ! आता ईकेवायसी प्रक्रियेकरिता दोन आधार नंबर पाहीजे असल्याने घट स्फोटीत व विधवा महिलांमध्ये आता चुळबूळ व चिंता सुरु झाली आहे. कारण,मेलेल्या नव-याच्या आधार नंबरशी लिंक होईना.आणि पतीशी घटस्फोट घेतल्याने त्याचा आधार मिळेना.म्हणुन विधवा व घटस्फोट झालेल्या महिलांमध्ये चलबिचल व चिंता वाढली आहे.


0 टिप्पण्या