Ticker

6/recent/ticker-posts

हंडरगुळी शिवारात तुर फुलो-याततरीही शेतकरी चिंतेत ..!


चित्रा न्युज प्रतिनिधी 
हंडरगुळी :-उदगीर तालुक्यात झालेल्या मोठ मोठ्या पावसाने खरीप हंगामातील हुकमी एक्का असलेले सोयाबीन या पीकाचे निर्सगाने वाटोळे केल्याने आणि घोषीत केल्याप्रमाणे शासनाने अतिव्रष्टीचे अनुदान दिले नसल्याने आता ना शासनावर भरवसा आहे.ना निर्सगावर.भरवसा आहे तर तो फक्त खरीपातीलच तुरीवरच..! कारण,सध्या हंडरगुळी शिवारात बहूतांश ठिकाणी तुरीचे पीक चांगले दाट व फुलो-यात आल्याचे दिसत आहे.म्हणुन आता तुर उत्पादन देईल भरपूर.असे वाटत असलेतरीही ऐन मोक्याच्या प्रसंगी निर्सग कोणता घाला घालेल.याचा कांही भरवसा नाही.व निर्सगाच्या घाल्याचा अनुभव नुकताच सगळ्यांनी घेतलाय म्हणुनच शेतकरी चिंता व्यक्त करतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या