चित्रा न्युज प्रतिनिधी
पुणे :-सांगली पोलिस दलातील तरुण सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरज मराठे (२५) यांनी पुण्यात विष प्राशन करून आत्महत्या केली. गुडघ्यांच्या तीव्र वेदनांमुळे उपचारासाठी रजा घेऊन ते डेक्कन परिसरातील लॉजमध्ये थांबले होते. घटनास्थळी सुसाईड नोट सापडली असून त्यात आजारपणाचा उल्लेख आहे. या प्रकरणाचा तपास डेक्कन पोलिस करत असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे सांगली व पुणे पोलिस दलात शोककळा पसरली आहे.


0 टिप्पण्या