चित्रा न्युज प्रतिनिधी
मुंबई:-दि. ८ जानेवारी २०२६ रोजी मुंबई स्थित सायन कोळीवाडा मध्ये प्रशिक मित्र मंडळ यांच्या पुढाकाराने बौध्दजन पंचायत समिती, शाखा क्रमांक ५३९, आदर्श महिला मंडळ यांच्या सहभागातून प्रामुख्याने युवा उद्योजक स्वप्निल कदम यांच्या विशेष प्रयत्नाने मुंबईच्या पहाटे सायन कोळीवाडा, ॲन्टॉप हिल मधील रावळी कॅम्पच्या गुरु तेग बहादुर नगर मोनो रेल स्टेशन नाक्यामधील पर्णकुटी हाऊसिंग सोसायटी चौकामध्ये अरुणाचल प्रदेशातील पुज्यनीय भन्ते आर्या थेरो आणि भन्ते संघरत्न थेरो यांच्या हस्ते जागतिक धम्म ध्वज दिन निमित्ताने बौध्द धम्माचे प्रतिक असलेल्या पंचरंगी धम्म ध्वजाचे सन्मानपूर्वक आरोहन करून सामुदायिक बुध्द वंदना घेत श्रध्दा भावनेने साजरा करण्यात आला.
प्रशिक मित्र मंडळाच्या अथक प्रयत्नातून साकार झालेल्या ह्या सोहळ्याप्रसंगी शाखेचे पदाधिकारीसह स्थानिक बौध्दाचार्य गमरे गुरुजी, आदर्श महिला मंडळ आणि प्रशिक मित्र मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
ह्याप्रसंगी सायन कोळीवाडा मधील धम्म प्रचारक बौध्दाचार्य जितेंद्र कांबळे गुरुजी ह्यांनी पुज्यनीय भिक्खु संघाच्या सुचनेनुसार जागतिक धम्म ध्वज दिनाचे महत्व सांगताना धम्म ध्वजाची संकल्पनेसह मान्यता संदर्भात मौलिक मार्गदर्शन करत जागतिक स्तरावर जिथे बौध्द वस्ती, बुध्द विहार स्थापित आहेत, तिथे धम्म ध्वज नव्याने सन्मानपूर्वक आरोहन करून बौध्द अस्तित्वाचे प्रतिक म्हणून स्थापित केले जाते, असे प्रतिपादन जितेंद्र कांबळे गुरुजींनी आपल्या मार्गदर्शनातून केले. त्याचबरोबर बौध्दाचार्य गमरे गुरुजी यांच्यासह शाखा पदाधिकारी संदिप जाधव ह्यांनी सर्वांना नव्या वर्षासह जागतिक धम्म ध्वज दिनाच्या मंगलमय सदिच्छा व्यक्त केल्या.
ह्या दिनाचे औचित्य साधून आदर्श महिला मंडळ पदाधिकारींनी पुज्यनीय भिक्खु संघासह धम्म प्रचारास आवश्यक साधनांसह आर्थिक धम्मदान करून आर्शिवाद घेतले.
शेवटी सामुदायिक सरणंतय् घेऊन स्थानिक भागात अल्पोपहार म्हणून मिष्टान्न वाटप करत हा मंगल दिन मनोभावे साजरा केला.


0 टिप्पण्या