चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा:-प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन विश्र्वशांती मिशन व जिल्हा सर्वोदय मंडळाचे तर्फे जिल्हा सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष एस. व्ही. हलमारे,उपाध्यक्ष के. झेड. शेंडे यांचे नेतृत्वात २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.या मध्ये ग्रीन हेरिटेज पर्यावरण संस्था भंडारा,अखिल भारतीय ग्राहक पंचायत समिती भंडारा ई चा सहभाग होता.जिल्ह्यात शहरातील व ग्रामीण भागातील शाळांनी या मध्ये सहभाग घेतला.शहरातील जिजामाता माध्य. व उच्च माध्य.विद्यालय,लालबहादूर शास्त्री(माजी मनरो) शाळा,विद्यालय,गांधी विद्यालय व कनिष्ठ महा.,मौलाना अबुल कलाम आझाद व डॉ जाकीर हुसैन न. प.उर्दू स्कूल,विद्यालय, भागिरथा भास्कर हायस्कूल,मिशन हायस्कूल भंडारा,संत शिवराम हायस्कूल, प्राथ.शाळा भंडारा,मानवता प्राथमिक शाळा भंडारा ई शाळा,महाविद्यालय येथे भेट देवून स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात आले.सर्वोदय मंडळाचे उपाध्यक्ष के.झेड.शेंडे,ग्रीन हेरिटेज पर्यावरण संस्थेचे संस्थापक/ अध्यक्ष मो सईद शेख, अ. भा. ग्रा.प.चे पर्यावरण आयाम प्रमुख संजय आयलवार,सर्वोदय समिती सचिव सुरेश गोमासे,कृष्णा मस्के सर,मारोती शेंडे,आनंद बाभरे ई नी शाळेला भेटी देवून मार्गदर्शन केले.



0 टिप्पण्या