Ticker

6/recent/ticker-posts

सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास!

चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 



चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती / चंद्रपूर : महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आज चंद्रपूर शहरातील महाकाली कॉलरी, कॅन्टीन चौक तसेच पठाणपुरा जोड देऊळ चौक येथे भव्य जाहीर सभा उत्साहात संपन्न झाल्या.

 या सभांमध्ये पालकमंत्री डॉ. प्रा.अशोक उईके साहेब , राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष  हंसराज भैया अहिर साहेब उपस्थित होते.
यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आणि चंद्रपूर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांचा उल्लेख करीत. रस्ते, पाणीपुरवठा, घरपट्टे, पायाभूत सुविधा, उद्योगवाढ, युवकांसाठी रोजगाराच्या संधी आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी फडणवीस साहेबांची दूरदृष्टीपूर्ण धोरणे हीच राज्याच्या प्रगतीची दिशा असल्याचे मत व्यक्त केले. महाकाली कॉलरी व पठाणपुरा परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विकास, स्थैर्य आणि विश्वासाच्या राजकारणासाठी भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीच सक्षम पर्याय असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला.
आगामी चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत विकासासाठी, सुरक्षित भविष्यासाठी आणि सक्षम प्रशासनासाठी भाजप–महायुतीच्या उमेदवारांना भरभरून मतदान करून विजयी करण्याचे आवाहन यावेळी सर्व जनतेला केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या