Ticker

6/recent/ticker-posts

मासळ नियतक्षेत्रातील अवैधरित्या रेती वाहतूक ट्रॅक्टर जप्त

भद्रावती वनपरिक्षेत्र अधिकारी यांची कारवाई.



चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती :  दिनांक १४ /०२ /२०२६ रोजी पहाटे अंदाजे ४.३० वाजताच्या सुमारास भद्रावती वनपरिक्षेत्रातील मासळ नियतक्षेत्रा मधिल अवैधरित्या रेती उत्खनन करून वाहतूक करीत असलेल्या मांगली (रै). ता. भद्रावती येथील एका महिन्द्रा सरपंच ट्रॅक्टर रेती वाहतूक करीत असतांना पकडले.
भद्रावती वनपरिक्षेत्रातील मासळ (रै)  नियतक्षेत्रा मधिल अवैधरित्या वाळू (रेती) उत्खनन करून वाहतूक करीत असलेल्या गुप्त माहितीच्या आधारे राजन तलमले विभागीय वन अधिकारी चंद्रपूर व तरसे सहाय्यक वनसंरक्षक (तेंदु) चंद्रपूर वनविभाग चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली के. डब्ल्यू धानकुटे वनपरिक्षेत्र अधिकारी भद्रावती यांचे नेतृत्वात क्षेत्रीय वनकर्मचारी राखीव वनाकडे गेले असता त्यांनी भारत वसंतराव बोढेकर रा. मांगली (रै) ता. भद्रावती यांच्या मालकिचे लाल रंगाचे महिन्द्रा सरपंच ट्रॅक्टर क्र. एम. एच.--  २९ -- बि. पि. ४१८ व लाल रंगाची ट्रॅक्टर ट्रॉली क्रमांक नसलेल्या शासकीय वनातील राखीव वन कक्ष क्र. २१९ नियतक्षेत्र मासळ येथील नाल्यातुन अवैधरित्या रेती उत्खनन करून वाहतूक करीत असल्याचे आढळून आले असता ट्रॅक्टर वरील वाहन चालक यांना त्यांच्याकडे रेती उत्खनन वाहतूक परवाना बाबत  कागदपत्र असल्यास दाखविण्यास सांगितले असता. त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्र नसल्याचे दिसुन आले. तेव्हा वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त केली असुन वाहन मालकावर वन गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर ही कारवाही ए. बी. शेळकी क्षेत्र सहाय्यक मासळ, कु. एस. आर. कुळमेथे वनरक्षक मासळ, एस. एस. पारवे वनरक्षक भद्रावती, अनिल शेंद्रे, किशोर मडावी, पवन मांढरे, नितीन राऊत यांनी मोहिम यशस्वी केली. तसेच रेती उत्खनन टाळण्याच्या दृष्टीने यापुढेही शोध मोहिम सुरु राहिल  असे सांगण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या