ओम नमः शिवाय | हर हर महादेव |
चित्रा न्युज प्रतिनिधी
गोरेगांव :-तालुक्यातील ग्राम हिरापुर येथे महाशिवरात्री पर्वाच्या निमित्ताने अत्यंत भक्तिमय व मंगलमय वातावरणात नंदी (पोहा) पूजन व मिरवणुकीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. ग्राम हिरापुर येथील
माजी उपसभापती, पंचायत समिती गोरेगांव मा.सुरेंद्रजी बिसेन यांच्या निवासस्थानी भगवान महादेवांच्या कृपेने चि. चित्रांश यांच्या नावाने कुलदैवत पोंगेझरा देवस्थान (बोळुंदा) येथे नेण्यासाठी नंदी (पोहा) पूजन विधी संपन्न झाला.दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी बाज्या-गाज्यांच्या निनादात व “हर हर महादेव”च्या
जयघोषात ही भक्तिमय नंदी मिरवणूक संपूर्ण हिरापुर गावातून बोळुंदा येथील पवित्र देवस्थानाकडे नेण्यात आली. यावेळी गावातील तसेच परिसरातील भाविकांनी प्रत्येक घरासमोर आरती करून भगवान महादेवांच्या नंदीचे दर्शन घेत आशीर्वाद प्राप्त केले. संपूर्ण परिसर शिवमय झाल्याचे भाविकांनी अनुभवले.
महाशिवरात्री पर्वानिमित्त पुढील धार्मिक कार्यक्रमांची रूपरेषाही जाहीर करण्यात आली असून दिनांक १५ फेब्रुवारी रोजी पोंगेझरा देवस्थान येथे नंदी देवदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच दिनांक १६ फेब्रुवारी रोजी माऊली कार्यक्रम होणार असून त्यानंतर दुपारी ३.०० वाजता हिरापुर येथील निवासस्थानी सर्व आमंत्रित व निमंत्रित भाविकांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या भक्तिमय सोहळ्यामुळे हिरापुर व आजुबाजुच्या परिसरात श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक एकात्मतेचे वातावरण निर्माण झाले असून महाशिवरात्री पर्व मोठ्या उत्साहात साजरा होत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. हर हर महादेव.


0 टिप्पण्या