सुजित एस. धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615
जामखेड:- छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त SunShine Film's निर्मित ‘महाराजांची वाघिण’ ही मराठी शॉर्टफिल्म नुकतीच यूट्यूबवर प्रदर्शित करण्यात आली आहे. ही शॉर्टफिल्म सामाजिक संदेश देणारी असून स्त्रीशक्तीचा प्रभावी संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारी आहे. त्यामुळे ही कलाकृती प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरू लागली आहे.
दि. १० फेब्रुवारी रोजी श्री अरण्येश्वर विद्यालय, अरणगाव येथे झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलनात या शॉर्टफिल्मच्या पोस्टरचे थाटामाटात अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमास विद्यालयाचे सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षकवृंद व पंचक्रोशीतील ग्रामस्थांची खूप मोठी उपस्थिती होती.
या शॉर्टफिल्मचे दिग्दर्शन विशाल पवळ यांनी केले आहे. प्रमुख भूमिकेत अभिनेत्री संजू कोहकडे यांनी प्रभावी अभिनय साकारला असून करण डाडर, कुणाल समुद्र, दिपक डाडर व अमोल नन्नवरे यांनी सहकलाकार म्हणून उत्तम साथ दिली आहे. चित्रिकरण भारत जिरेकर यांनी केले असून दृश्यरचना उठावदार झाली आहे.
चित्रपटाचे शीर्षक गीत महाराष्ट्राचे गायक मनोज गरडकर यांनी गायले असून ते देखील SunShine Film's या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित करण्यात आले आहे.
या शॉर्टफिल्मचे चित्रीकरण जामखेड तालूक्यातील पारेवाडीत झाले असून गावकरी फाउंडेशन पारेवाडी व समस्त पारेवाडीकरांचा विशेष सहभाग लाभला आहे.
ही शॉर्टफिल्म सर्वांनी एकदा अवश्य पाहावी, असे आवाहन दिग्दर्शक विशाल पवळ यांनी केले आहे.


0 टिप्पण्या