Ticker

6/recent/ticker-posts

निमसाखर मध्ये यंदाची शिवजयंती साध्या पद्धतीने.

रक्तदान शिबिरातून अजितदादांना वाहणार आदरांजली


चित्रा न्युज प्रतिनिधी 
इंदापूर :- निमसाखर येथे मागील अनेक वर्षांपासून फेब्रुवारी महिन्यात शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात येत असतो. तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात अनेक सामाजिक उपक्रम, शिबीरे, स्पर्धा आणि खेळ आयोजित करण्यात येतात. तर पारंपारिक ढोल ताशा पथक, हलगी यांसह १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मूर्तीसह शाही रथातून मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीत गावातील सर्व जाती धर्मातील महिला, पुरुष आणि गावातील सर्वच शाळांतील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी उपस्थित राहत असतात. मिरवणुकीनंतर उपस्थित सर्वांना उत्सव समितीच्यावतीने अन्नदान केले जाते.
शिवजयंती उत्सव म्हणजे निमसाखर मधील सर्वात मोठ्या सोहळ्यापैकी एक सोहळा मानला जातो. गावात तीन दिवस शिवमय उत्साही वातावरण असते. गेली सलग १४ वर्षे गावात सार्वजनिक शिवजयंती उत्सव सोहळा साजरा करण्यात येत आहे. 
यंदाच्या वर्षी मात्र छ श्री शिवाजी महाराज सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने हा सोहळा एकच दिवस आणि अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री स्व अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्रासह बारामती परिसरात अध्यापही शोकाकुल वातावरण असल्याने कोणताही सोहळा साजरा करणं योग्य नसल्याने समितीच्या बैठकीत एक मुखाने शिवजयंती उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरले आहे. 
१९ फेब्रुवारी रोजी सकाळी छत्रपती शिवरायांच्या मूर्तिचे गावाकऱ्यांच्या उपस्थितीत पूजन करुन अजितदादांना आदरांजली म्हणून रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे.

या बैठकीस संयोजक सुदर्शन रणवरे यांसह मार्गदर्शक प्रतापबापू कदम, अण्णा पाटील, संतोष पाटील, संतोष रणसिंग, मंगेश निंबाळकर, विनोद रणसिंग, शिवराज रणवरे, हर्षल रणवरे, शांताराम रणवरे, सचिन रणवरे, मंदार मोरे, लालासाहेब चव्हाण, पांडुरंग पानसरे, सुलेख रणवरे, अमित अडसूळ, सागर रणवरे, शुभम कदम, संदीप राजेभोसले, अमित चव्हाण, अरविंद अडसूळ, शैलेश पवार, नवनाथ रणवरे, चंद्रकांत गोरे, डॉ कृष्णदीप रणवरे, जयदीप पवार, गणेश पवार, अर्जुन घोरपडे, सत्यजित रणवरे, राजेंद्र पवार, रविंद्र पवार, रुपेश रणवरे, प्रशांत बोन्द्रे, कल्याण रणवरे, दया भोसले, सतीश पवार, नंदकिशोर गायकवाड, दीपक रणवरे, किरण रणवरे, राजेंद्र बर्गे, अतुल जाधव, सुशांत रणवरे, दत्ता रणवरे, धनंजय रणवरे, विशाल राजेमाने, सिद्धार्थ रणसिंग, शिवदत्त रणवरे, बाळासाहेब मोरे, विकास धनवडे, विक्रम जाधव, अस्लम शेख, मोहसीन मुलाणी, सुरज धनवडे, रोहित रणवरे, दिग्विजय रणवरे, अभिषेक सूर्यवंशी, अभिषेक गोरे, राजवर्धन रणवरे, संदेश कांबळे, निरंजन माने, यश जगताप, शंतनू रणवरे, भैय्या क्षीरसागर, अजिंक्य चव्हाण, नितीन रणवरे आदी सदस्य उपस्थित होते.


( राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नुकतेच दुर्दैवी अपघाती निधन झाल्यामुळे यंदा उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने पार पाडणार आहोत. यंदा कोणतेही मनोरंजन कार्यक्रम किंवा मिरवणूक होणार नाही. फक्त सालाबादप्रमाणे महाराजांच्या मूर्तिचे पूजन आणि त्यानंतर रक्तदान शिबीर होईल.

- मंगेश निंबाळकर - प्रमुख विश्वस्त, शिवजयंती उत्सव समिती, निमसाखर )

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या