श्री संत गजानन महाराज मंदिरात हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
चित्रा न्युज प्रतिनिधी
श्रीक्षेत्र माहूर :-अनेक वर्षापासून चालत आलेल्या परंपरेनुसार माहूर शहरातील श्री संत गजानन महाराज मंदिरात श्री संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त महाप्रसादाचे आयोजन नगरसेवक गोपू महामुने यांच्याकडून करण्यात आले होते या महाप्रसादाचा शहरासह गडावर दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांनी लाभ घेत मोठ्या भक्ती भावात श्री संत गजानन महाराज प्रगट दिन साजरा केला
माहूर शहरातील राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला असलेल्या श्री संत गजानन महाराज मंदिरात दरवर्षी श्री संत गजानन महाराज प्रकट दिन साजरा करण्यात येतो यावर्षी परंपरेनुसार श्री संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त भाजपाचे नगरसेवक गोपू उर्फ सागर महामुने यांच्याकडून शहरासह तालुक्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत आलेल्या हजारो भाविकांना महाप्रसाद रुपी जेवण देऊन पूजा आरती करून प्रगट दिन साजरा करण्यात आला
यावेळी शहरासह गडावर दर्शनासाठी आलेले सर्वधर्मीय भाविक भक्त मान्यवरासह महामुने यांच्या परिवारातील सर्व सदस्यांनी तसेच मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेत महाप्रसाद वाटप करण्यास मदत करून पुजारी समुद्रे महाराज यांचे कडून प्रवचन रुपी आशीर्वाद घेतले श्री संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त तालुक्यात ठिक ठिकाणी असलेल्या गजानन महाराज मंदिरात भजन अन्नदान करून प्रगट दिन साजरा करण्यात आला



0 टिप्पण्या