Ticker

6/recent/ticker-posts

करंजेकर फार्मसी महाविद्यालयात महिला दिन

चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली:-वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था द्वारा संचालित, बाजीरावजी करंजेकर कॉलेज ऑफ फार्मसी येथे महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सावित्रीबाई फुले आणि माता सरस्वती प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. चित्रांगणा रामटेके, प्रा. गीतांजली गडपायले, प्रा. खुशबू रहांगडाले आदी मान्यवर उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिला दिनाचे महत्त्व व्यक्त केले. महिला दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयातील सफाई महिला कर्मचारी दुर्गा देशमुख, ज्योती बहावे, अस्मिता गजभिये यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाच्या समन्वयिका पूजा देशपांडे यांनी केले. संचालन प्रा. दिपाली विठ्ठले तर आभार खुशबू रहांगडाले यांनी मानले. सदर कार्यक्रमास संस्था संस्थापक अध्यक्ष डॉ. ब्रह्मानंद करंजेकर, संस्था अध्यक्ष डॉ. सोमदत्त करंजेकर, संस्थेच्या सचिव डॉ. वृंदाताई करंजेकर, व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉक्टर लोकानंद नवघरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आतिश शहारे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या