Ticker

6/recent/ticker-posts

सागरा येथे राज्यशासन सेलिब्रेटी भारत गणेशपुरे मंगळवारला येणार

 
चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : तालुक्यातील सागरा येथे राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान ग्रेट सेलिब्रेटी भारत गणेशपुरे मंगळवारला सकाळी आठ वाजता पंचायत समिती भद्रावती अंतर्गत ग्रामपंचायत सागरा येथे गावभेटीचा कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आलेले आहे.

   या कार्यक्रमात प्रथम प्रभात फेरी काढुन मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा प्रसार व प्रचार करुन नावीन्यपूर्ण उपक्रमास भेटी यामध्ये लोकसहभागातून सार्वजनिकसभागृह,स्मशानभूमी,निराधार गृह ,फळबाग, गोरक्षण आदिना भेटी देऊन सेलीब्रेटी व प्रमुख अतिथीच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
    वरील कार्यक्रम जिल्ह्य परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मा.पुलकित सिंग यांच्या मार्गदर्शनात उप मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत,गट विकास अधिकारी व सहा.गट विकास अधिकारी,प्रशासक,ग्रामपंचायत पदाधिकारी व अधिकारी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत होणार आहे.
    या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आशुतोष सपकाळ, सहा.गट विकास अधिकारी डॉ.बंडुआकनुरवार, ग्रामपंचायत प्रशासक शंकर रासेकर,ग्रामपंचायत अधिकारी सुशिल शिंदे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या