चित्रा न्युज प्रतिनिधी
हंडरगुळी :-९ फेब्रूवारी रोजी लागलेल्या निकालात उदगीर तालुका पंचायत समितीवर भाजप- रा.काॅं.महायुतीने वर्चस्व प्राप्त केले असून दि.९मार्च रोजी होणा-या सभापती व उपसभापतीपदाच्या निवडी कडे तालुक्याचे लक्ष लागले सभापती पद ओबीसी स्ञी वर्गासाठी राखीव आहे.अन् यासाठी ३ महिला रेस मध्ये असल्याने कौन बनेगा सभापती?अशी चर्चा सबंध तालुक्यात आहे.
२०१२ चा अनुभव पाहता पं.स.चे उपसभापतीपद हंडरगुळी गणाला मिळणार. ही चर्चा पण जोर धरत आहे.
कारण,२०१२ मध्ये इं.काॅं.ने बहूमत प्राप्त केले होते.अन् तेंव्हा वाढवणा गटातील जि.प.सदस्याला जिल्ह्याचे आणी हंडरगुळी गणातील सदस्याला तालुक्याचे सभापती पद मिळाले होते.
म्हणुन उद्या दि.९ मार्च रोजी होणा-या निवडीत हंडरगुळी गणातील भाजप उमेदवार विक्की भोसले हे पं.स.चे उपसभापतीपदाचे प्रबळ दावेदार मानले जातात.
कारण,निवडुण जरी भाजप मधून आले असले तरीही आ.संजय बनसोडे यांच्या विश्वासु टाॅप-5मध्ये विक्की भोसलेंचा नंबर वरचा आहे.
म्हणुन सदस्यसंख्येनुसार सभापती रा.काॅं.चा आणि उपसभापती भाजपचा तो पण हंडरगुळी गणाचाच होईल असा आशावाद पंस. गणातील मतदारांना वाटतो.
सभापती रा.काॅं.चा होणार हे निश्चित असले तरीही ती 'लकी' महिला कोण असेल याकडे लक्ष लागले आहे.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत इं.काॅं.ने उभा केलेले चक्रव्यूह शिस्तबध्द पध्दतीने परतावून लावून विक्रमी मताधिक्यांनी पं.स. हंडरगुळी गणात भाजपचा प्रथमच झंडा फडकावलेले विक्की भोसले यांना पुढील उपसभापतीपद वरिष्ठ नेते मंडळींनी मिळवून द्यावे.
एजाज चौधरी,नागरिक
हंडरगुळी..
वाढवणा गटात व हंडरगुळी गणात प्रथमच भाजपचा झंडा फडकावलेल्या राम तिरुके व विक्की भोसलेंना सभापती व उपसभापती पद मिळायलाच पाहिजे.
शेख हामजा टेलर,ग्रामस्थं हाळी.ता.उदगीर
भाजप श्रेष्ठी व आ.संजय बनसोडे यांनी भविष्यातील राजकारणाचा तसेच गत १० वर्षात या भागाचे न झालेले 'कल्याण' याचा विचार करावा.आणि गट व गणाला प्रचारसभेत जाहिर केल्याप्रमाणे सत्तेत स्थान मिळवून द्यावे.
मनोज मसुरे,ग्रामस्थं,हाळी.
भाजप-रा.काॅं.श्रेष्ठींचा निर्णय काय व कोणता?
आगामी सभापती कोण?हे रा.काॅं.चे आ.संजय बनसोडे ठरवणार,तर उपसभापती कोण होणार.हे भाजपा ठरवणार आहे.निवडणुक प्रचाराच्या शेवटच्या सभेत वाढवणा गट व हंडरगुळी गणाला सत्तेत वाटा देणारच असे छञपती शिवरायांच्या साक्षीने त्यावेळी उपस्थित हजारो मतदारांना संजय बनसोडे(आमदार)यांनी दिले होते.आणी आजवरचा इतिहास पाहता शब्दाचे पक्के अशी ओळख असलेले आ.संजूभाऊ तो शब्द पाळतील का?याकडे हाळीहंडरगुळी,वाढवणा परिसराचे लक्ष लागले आहे


0 टिप्पण्या