Ticker

6/recent/ticker-posts

दिनेश झाडे यांची रिपाइं कोरपना तालुका अध्यक्षपदी तर महासचिवपदी मुनेश्वर मेश्राम आणि चंपतभाऊ राजुरकर यांची संघटकपदी निवड

चित्रा न्युज प्रतिनिधी 
चंद्रपूर : तारीख १३ मार्च २०२६ ला स्थळ- ऐतिहासिक बुद्धभूमी गडचांदूर त कोरपना जि चंद्रपूर येथे समता सैनिक दलाच्या वर्धापनदिनानिमित्य बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश चिटणीस अशोककुमार उमरे विराजमान होते.  सदर बैठकीत पिपरी (नारंडा) येथील माजी ग्रामपंचायत सरपंच दिनेश झाडे पत्रकार यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका कोरपनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. तसेच उपरवाही येथील सामाजिक कार्यकर्ते मुनेश्वर मेश्राम उपरवाही यांची पक्षाच्या कोरपना तालुका महासचिव आणि कुकुडसाथ येथील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते चंपतभाऊ राजुरकर यांची कोरपना तालुका संघटक म्हणून निवड करण्यात आली.
बैठकीला अशोककुमार उमरे, चंद्रपूर जिल्हा युवा जिल्हाध्यक्ष सुरजभाऊ उपरे, समता सैनिक दलाचे जिल्हा समन्वयक बी. जी. गायकवाड, जेष्ठ समता सैनिक बी. बी. गेडाम, प्रभाकर खाडे, चंपतभाऊ राजुरकर, समता सैनिक दलाचे तालुका संघटक हंसराज ताकसांडे, सुनील वालदे, दिनेश झाडे, नामदेवराव लांडगे, मुन्ना मेश्राम, राजेश वाघमारे, आकाश ताकसांडे इत्यादी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या