Ticker

6/recent/ticker-posts

नेताजी सुभाष चंद्र बोस राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार 2026 लातूर. प्रबोधनकार भीम शाहीर तथा पत्रकार प्रदीप कडबे यांची निवड.




चित्रा न्युज प्रतिनिधी 
नागपूर : मातृभूमीचे रक्षण करणे, हे प्रत्येक भारतीयांचे  प्रथम कर्तव्य आहे. कायद्याचे विचार! स्वाभिमानी आचार. महाराष्ट्र पोलीस मित्र शोषल असोसिएशन ( महाराष्ट्र राज्य) यांच्या विद्यमाने नेताजी सुभाष चंद्र बोस राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा - 2026 लातूर रविवार दिनांक- 29 मार्च 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता  भालचंद्र ब्लड बँक, बस स्टँड च्या पाठीमागे लातूर येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमाला रामटेक तालुक्यातील किरणापूर  येथील बुद्ध फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा बुलंद आवाज प्रबोधनकार भीम शाहीर  तथा पत्रकार प्रदीप बागवान कडबे यांना त्यांच्या सामाजिक सांस्कृतिक ग्रंथालय चळवळीतील, व पत्रकारीतेतील, भरीव कार्याची दखल घेऊन त्यांना नेताजी सुभाष चंद्र बोस राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार - 2026 लातूर येथे देऊन सन्मानित करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक - संस्थापक सचिव सुफी  सय्यद समशुद्दीन यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या