समारंभाला अनेक मान्यवरांची उपस्थिती
लाभले आम्हास भाग्य- बोलतो मराठी!
जाहलो खरेच धन्य- ऐकतो मराठी!
२७ फेब्रुवारी हा दिवस ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त श्रेष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस !
चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपूर :-मराठी साहित्यातील त्यांचे अतुलनीय योगदान आणि मराठी भाषेच्या समृद्धीसाठी त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी २०१३ पासून हा दिवस मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो.
हा दिवस केवळ शुभेच्छा देण्यासाठी नाही तर, आपली मायबोली मराठीचा सन्मान करण्यासाठी, तिचा इतिहास जाणून घेण्यासाठी आणि भाषेच्या संवर्धनासाठी आयोजित केला जातो.
मोहोळच्या लोटस स्कूल येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त नुकतेच एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आयोजित
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून सुलोचना पाटील प्रामुख्याने या उपस्थित होत्या.
या शिवाय शाळेच्या संस्थापिका विजया देशपांडे ,रोहिणी देशपांडे ह्या देखील उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांनी कवी विष्णू वामन शिरवाडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.
सदरहू कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन मराठी विषयाच्या करण शिक्षिका अंजली देशपांडे यांनी केले.
इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी उत्तम व सुरेख पथनाट्य सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. LKG मधील काव्यांजली देशमुख या एका छोट्याशा विद्यार्थीनीने छान असे बडबडगीत सादर करुन अनेकांचे लक्ष वेधले होते.
पथनाट्यासाठी अंजली देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे फलक लेखन अनुक्रमे स्मिता गुमते व सोनाली स्वामी यांनी केले.तर राणी पुराणिक व प्रणिता गरड यांनी कार्यक्रमस्थळी मनोवेधक रांगोळी रेखाटली होती.उपरोक्त कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पूर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका केतकी देशपांडे आणि प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका निकिता देशपांडे या शिवाय सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीवृदांनी अथक परिश्रम घेतले.


0 टिप्पण्या