Ticker

6/recent/ticker-posts

मंजुषा चित्रिवेकर यांना स्वामिनी सन्मान पुरस्कार घोषित

चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली:-तालुक्यातील मंजुषा लोकेश चीत्रीवेकर यांची राज्यस्तरीय स्वामिनी पुरस्कार करिता निवड करण्यात आली आहे. तालुक्यातील पिंडकेपार येथील माहेरवासीन असलेल्या आणि पूर्व सेंदूरवाफा येथील रहिवासी असलेल्या मंजुषा लोकेश चीत्रीवेकर यांची मोजक्या महिलांमधून निवड करण्यात आली. साहित्य या क्षेत्रात बहुमूल्य कामगिरीकरिता त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. मंजुषा चित्रीवेकर यांना हा पुरस्कार २८ मार्च २०२६ रोजी डोंबिवली पूर्व मुंबई वक्रतुंड सभागृह येथे प्रदान करण्यात येणार आहे. सदर पुरस्कार सोहळा कल्याण डोंबिवली खासदार श्रीकांत शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, कल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरे, कल्याण पूर्व आमदार सुलभा गायकवाड, केडीएमसी महापौर हर्षाली चौधरी, उपमहापौर केडीएमसी राहुल दामले, पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य गायक कलाकार रघुनाथ फडके, स्त्री रोग तज्ञ डॉ. सुनिता गोगटे, नेत्ररोग तज्ञ डॉ. अनघा हेरूर, फिल्म निर्माती प्रज्ञा परसुळे, संगीत शिक्षिका रेशमा आवटे( फावडे ) या मान्यवरांच्या उपस्थितीत सदर पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या