Ticker

6/recent/ticker-posts

महिलांनी आपल्या आरोग्याप्रति जागरूक राहावे- वनिता देशमुख

 चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंंडारा:-जागतिक महिला दिन निमित्त योगभारती बहुउद्देशीय संस्थे च्या वतीने शिवार्पण  टॉवर येथे आयोजित कार्यक्रमात श्रीमती वनिता देशमुख  यांनी प्रमुख अतिथी म्हणून प्रतिपादन केले की. "महिलांनी आपल्या आरोग्या प्रति जागरूक रहावे,अनेकदा महिला आपल्या कुटुंबाच्या देखभालीत इतक्या व्यस्त होतात की, त्या आपल्या आरोग्या कडे दुर्लक्ष करतात. महिला स्वस्थ असेल तर परिवार, समाज व देशही स्वस्थ राहील.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभाकर तितीरमारे, मुख्य योग शिक्षक व संस्थाअध्यक्ष शाम कुकडे, मधुकर गभने, सईद भाई शेख, हरिभाऊ थोटे, चिंधुजी बुधे, ललित बिसेन, श्रीमती लता ईलमे, रेखा वासनिक, चित्रा मोहतुरे, अतुल वर्मा आदि मान्यवर उपस्थित होते.

अतिथी मो. सईद भाई शेख यांनी आपल्या संबोधनात म्हंटले की, विश्व महिला दिवस महिलांना समर्पित आहे. अतीत व इतिहासात महिलांनी समाजात मोठे योगदान व कामगिरी केली है. समाजाची नींव  आहे महिला सशक्तिकरण. जेव्हा महिला शिक्षित, आत्मनिर्भर व सम्मानित होईल तेव्हाच समाज पण प्रगती करेल.
 सूत्र संचालन शाम कुकडे यांनी केले व आभार पुरुषोत्तम वैद्य यांनी मानले. सर्व योगसाधक या प्रसंगी उपस्थित थे होते.
कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी पुरुषोत्तम साकुरे ,संजय मोहतुरे  इत्यादि नि केले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या