चित्रा न्युज प्रतिनिधी
भंंडारा :-दि. ८ मार्च २०२६ ला जेएमपीसी गृप च्या स्नेहमिलन सोहळ्यात शिवम हॉटेल, भंडारा येथील सभागृहात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा महिला व बालकल्याण सभापती आशा उईके, प्रमुख अतिथी सहा. शिक्षिका निर्मला रंगारी तसेच माजी प्राचार्य नरेंद्र गणविर व वर्षा गणविर यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, वीरांगना राणी अवंतीबाई लोधी आणि त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले व विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी माजी पोलीस निरीक्षक सोमेश्वर शेंद्रे, माजी पोलीस उपनिरीक्षक ललित टिकारीया, साहित्यिक व नाट्यअभिनेता प्रा. डॉ. शिलवंतकुमार मडामे, ईटीव्ही न्यूज चॅनल व ‘हुकमाचा ताबेदार’ साप्ताहिकाचे मुख्य संपादक संतोष लांजेवार, माजी गटशिक्षणाधिकारी तत्वराज अंबादे, माजी मुख्याध्यापक सोविंदा मेश्राम, माजी प्राचार्य राजेंद्र पटले, माजी प्राचार्य राजन बोरकर, हरिभाऊ मेश्राम, रमेश शेंडे, प्रा. ईस्तारी पडोळे, प्रमोद थोटे व राजकुमार कांबळे यांच्या उपस्थितीत माजी प्राचार्य नरेंद्र गणविर यांचा शैक्षणिक कार्यासाठी सेवापूर्तीसाठी सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी पतीने पत्नीबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पत्नीला गुलाबपुष्प देऊन पेढा भरवून गौरव केला. नरेंद्र गणविर यांनी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जीवनसंघर्षाची प्रेरणादायी यशोगाथा सांगितली. महिलांच्या कर्तृत्वाचा उत्सव साजरा करताना महिलांच्या समस्या, त्यांच्या मुक्तीसाठीचे कार्य, शिक्षणाद्वारे सक्षमीकरण व दर्जेदार जीवन या विषयांवर उपस्थित महिला व पुरुषांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच लिंगभेद न मानता समानतेचे आव्हान करण्यात आले.
स्नेहांश कान्हेकर यांनी गीतगायन करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच आनंदमय वातावरणात सामूहिक नृत्यांचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाला संस्था सचिव हिरालाल गजभिये, ग्रा.पं. सदस्या वैशाली मेश्राम यांच्यासह किरण टिकारीया, अल्का मुरलीधर पवनकर, माधुरी मेश्राम, सप्नजा मेश्राम, श्रृती मेश्राम, विशाखा अंबादे, गीता चिंधालोरे, समीक्षा चिंधालोरे, लता थोटे, प्रतिभा शेंडे, संध्या बोरकर, संगिता पडोळे, निता मडामे, सम्येक मडामे, जागृती मडामे, रजनी पटले, अमन पटले, अंकूर गणविर, मृणाली कान्हेकर, आशा गजभिये, बबिता कांबळे, माया कांबळे, सविता गजभिये, अशोक गजभिये, अनिरुद्ध गजभिये, सुनिल नागदिवे, सतिश मेश्राम, प्रा. नानाजी गजभिये, प्रा. अरुण कांबळे, सौरभ मेश्राम, संकेत मेश्राम उपस्थित होते. कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन प्रा. डॉ. शिलवंतकुमार मडामे यांनी केले, तर आभार प्रदर्शन दिनदयाल दमाहे यांनी केले.


0 टिप्पण्या