चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा ;- महिला व बालविकास विभाग आणि ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने आज भंडाऱ्यात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलं असून विशेष म्हणजे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित महिलांनी आपण खरंच स्त्रीचा सन्मान करतो आहोत की फक्त तिचा गौरव करण्याची औपचारिक परंपरा जपतो आहोत?एका बाजूला स्त्रीला ‘देवी’, ‘मातृशक्ती’ अशा गौरवपूर्ण विशेषणांनी सन्मानित केलं जातं, तर दुसऱ्या बाजूला तिच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर अजूनही अनेक अदृश्य मर्यादा आहेत आणि देशात महिलांवर होणारे अन्याय अत्याचारावा आढावा बसावा अश्या भावना सुद्धा व्यक्त केल्या आहेत.हे कार्यक्रम एस डी महाविद्यालय भंडारा येथे आयोजन असून संस्थापक अध्यक्ष रोशन जांभुळकर यांनी जागा उपलब्ध करून दिली.या कार्यक्रमा प्रसंगी ओबीसी क्रांती महिलाध्यक्ष शोभा बावनकर,जिल्हाध्यक्ष संजय मते,प्रमुख अतिथी वैशाली सतदेवे,जिल्हा समन्वयक लोकप्रिया देशभ्रतार,विजया वंजारी,शकुंतला पाटील,नालदा पाटिल,शीतल गेडाम मीनाक्षी चव्हाण,मंजू आंबाडहारे, मनीषा भांडारकर,कोमल दुबे,पूजा पाटील,नालंदा पाटील,मंजू आंबेडारे अन्य महिला उपस्थित असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्की सेलोटे तर आभार प्रदर्शन सुरेखा गायधने यांनी केले.


0 टिप्पण्या