Ticker

6/recent/ticker-posts

तुडमापुरी येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस


चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली :-जि. प. उच्च प्राथमिक शाळा तुडमापुरी येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस, बालक, पालक आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच नरेश राऊत, प्रमुख पाहुणे म्हणून नरेंद्र घरत अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती तुडमापूरी, दुर्जन घोरमारे उपसरपंच, देवराम चांदेवार पोलीस पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय सांदेकर, चैतन्य चौके, धनराज श्रीरामे, रेवंता वंजारी, गोपालबापू घोरमारे, राजेश कोटांगले, वि. टी. घरत, प्रतिभा घोरमारे, हेमलता चौधरी, राखी चौके, प्रेमलाल सावसाकडे, आत्माराम शेंडे, सत्तेशीला मौजे, मनीषा बडोले, रुक्मिणी घोरमारे व इतर गावकरी मान्यवर मंडळी  उपस्थित होते. या कार्यक्रमाला राम चाचेरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक डी.डी. वलथरे यांनी केले. सूत्रसंचालन पदवीधर शिक्षक वाय. टी. हुकरे तर आभार प्रदर्शन आर. डी. पारधी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिगंबर कापगते, प्रमोद चौधरी, सरोज शेंडे, सुनंदा चौधरी, मंदा घरत, शिवकन्या सावसाकडे, आनंदा नेवारे यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या