चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली:- पतंजली योग परिवार साकोली-सेंदुरवाफा यांच्या संयुक्त विद्यमाने निशुल्क योग प्राणायाम शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. ६ मार्च ते ८ मार्च २०२६ रोजी सकाळी ६ ते ७:३० वाजता दरम्यान होणार असून सदर आयोजन जुनी ग्रामपंचायत परिसर सेंदुरवाफा येथे करण्यात आलेले आहे. सदर शिबिराला नागपूर येथील योगाचार्य डॉ. संजय खोडे हे मार्गदर्शन करणार आहेत. सदर शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन पतंजली योग परिवार साकोली सेंदुरवाफा समिती तथा जिल्हा पतंजली योग परिवारातील पदाधिकारी यांनी केलेली आहे.


0 टिप्पण्या