Ticker

6/recent/ticker-posts

"स्त्री ही राष्ट्राची शिल्पकार व जागरूक ग्राहक":सौ.मधुरा मदनकर

(अ.भा.ग्रा.प.चे जागतिक महिला दिन व ग्राहक हक्क दिनावर भगिनींच्या कर्तृत्वाचा सन्मान सोहळा)


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंंडारा :-जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आपल्या आयुष्याच्या अविभाज्य भाग असलेल्या घरघुती मदतनिस भगिनींच्या कर्तृत्वाचा सन्मान म्हणुन अखिल भारतीय ग्राहक पंचायत भंडारा च्या वतीने जागतिक महिला दिन व जागतिक ग्राहक हक्क दिन -2026 श्री सिद्ध चिंतामणी गणेश मंदिर, वेलकम कॉलोनी, खात रोड भंडारा येथे अत्यन्त उत्साहात साजरा करण्यात आला.
मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन अ. भा.ग्रा.प. चे प.क्षेत्रीय संघटन मंत्री श्री नितिन काकडे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणुन नगराध्यक्षा (न. प. भंडारा)सौ. मधुरा मदनकर ,न.प. नगरसेविका सौ. कुलप्रीत चढ़ढा,तथा ग्राहक पंचायत चे जिल्हाध्यक्ष श्री जयंत सब्जीवाले,जिल्हा महिला प्रमुख सौ. दीप्ती कुरोड़े मॅडम इत्यादि मान्यवर उपस्थित होते. 
 मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पुष्पगुच्छ देवून मान्यवर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
 या प्रसंगी श्री विष्णुपंत पंडे यांनी एक गीत _"विसरू नको"  तर  विदर्भ आईटी सेल प्रमुख श्री चंद्रशेखर साठे यांनी "जय ग्राहक शक्ति ".. गीत सादर केले. 
  या प्रसंगी अत्यंत माहितीपरक सौ. दीप्ती कुरोड़े यांनी प्रास्ताविक केले तर उत्कृष्टरीत्या सूत्र संचालन सौ. जयश्री सातोकर यांनी.प्रमुख अतिथी सौ.मधुरा मदनकर यांनी-"स्त्री आपल्या घरची  आधार स्तंभच नाही तर ती राष्ट्राची शिल्पकार आहे .स्त्री शक्तीचा जागर,आदर, त्यांच्या कर्तव्याच्या,गुणांचं जाणीव करून,महिला सशक्तिकरण चा संदेश देणारा हा दिवस आहे. आजची जागरूक ग्राहक पण महिलाच आहे. दिवा जळतो आणि अंधारात प्रकाश देतो,पूर्वीच्या महिला दिव्या सारख्या जळत राहील्या.असे प्रतिपादन केले. 
     प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित सौ. कुलप्रीत चढ़ढा यांनी "हे केवळ महिलांचे सन्मानच नव्हे तर त्यानी समाजात जे आपले अमूल्य योगदान दिले आहे,हे त्यांचे सन्मानाचे  क्षण आहे. ती घराची नींव असून घर आणि कुटुंबाला घडवून संस्कार देते. प्रत्येक क्षेत्रात नारीचे योगदान आहे, सर्वात मोठी ग्राहक महिलाच आहे, आणि ती जागरूक आहे. ग्राहक पंचायत च्या माध्यमातून  ग्राहकांना आपल्या मातृशक्तीचा आभास पण होत असल्याचे" त्यांनी प्रतिपादन केले. श्री नितीन काकडे यांनी विश्व ग्राहक दिनाच्या महत्वाबद्दल आपले विचार मांडले. शेवटी 9 महिलांनी भारतातील विविध भागातील वेषभूषा धारण करून *वंदे मातरम* या राष्ट्रीय गीतांवर नृत्य सादर केले. ग्राहक पंचायत च्या समूहाने "उठ-उठ नारी आता घेग तू भरारी" गीत सादर केले.
या प्रसंगी घरघुती मदतनीस 12 महिलांचा सत्कार करण्यात आला व त्यांच्या अनुभवातून उपस्थितांना मार्गदर्शन लाभले. सत्कारमूर्ती मध्ये पूजा विठूले (घाटकुरोडा),मनीषा भीमटे ,उषा नेवारे, सौ. निकीता मुळे, सौ.रेखा येळणे ,सौ.ज्योती नेवारे,विद्याताई आवळे, संगीता भिवगडे, शोभाताई ठाकरे,भारती भिवगडे,कल्पना काळसरपे ,संगीता नेवारे (भंडारा) इत्यादी चा समावेश  होता. पूजा विठुले, रेखा येळणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सौ. कल्पना पनके यांनी सर्व पाहुण्यांचे व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणार्‍या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. एकंदरीत हा  महिला दिन प्रेरणादायी, उत्साहवर्धक आणि समाजात महिलांच्या योगदानाची जाणीव करून देणारा ठरला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या