चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपूर : मध्यपूर्व अमेरिका - इस्रायल आणि इराणमधील तणावामुळे निर्माण झालेल्या अस्थिर परिस्थितीत दुबई येथे अडकलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील ज्योती पुरुषोत्तम दुपारे या युवतीचे अखेर सुखरुपपणे मायदेशी आगमन झाले आहे. अनेक दिवस भीती आणि अनिश्चिततेच्या वातावरणात अडकलेल्या ज्योतीच्या सुरक्षित परतीमुळे कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. या प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे पुर्व विदर्भ संपर्क मंत्री ॲॅड. आशिष जयस्वाल आणि शिवसेनेचे चंद्रपूर लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे यांच्या पुढाकारामुळे ज्योतीची सुरक्षित सुटका झाल्याची भावना कुटुंबियांनी व्यक्त केली.
काही दिवसांपुर्वी दुबईत वास्तव्यास असलेल्या ज्योती दुपारे यांना अमेरिका - इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मोठ्या चिंतेचा सामना करावा लागत होता.युध्दसुदृश वातावरण आणि सतत येणाऱ्या धोकादायक बातम्यामुळे त्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे मायदेशी आणि कुटुंबीयांजवळ परतण्याची त्यांची तिव्र इच्छा होती. परंतू परिस्थीतीमूळे भारतात परतण्याचा मार्ग कठीण झाला होता. मुलगी परदेशात अडकुन असल्याची चिंता सहन न झाल्याने वडिलांनी शिवसेनेचे मुकेश जिवतोडे यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुकेश जिवतोडे यांनी तात्काळ पुढाकार घेऊन शिवसेनेचे पुर्व विदर्भ संपर्क मंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून ज्योती दुपारे यांच्या सुरक्षित परतिसाठी प्रयत्न सुरु केले. त्यांच्या हस्तक्षेपामुळे दुबई वरून भारतात परतण्याची आवश्यक व्यवस्था करण्यात आली आणि अखेर ती लेक सुखरुपपणे मायदेशी परतली.
-----------------------------------
ही मदत आयुष्यभर विसरणार नाही.
---------------------------------
या विषयी ज्योती दुपारे यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना सांगितले की त्यावेळी मनात भीती आणि अस्वस्थता होती. आपण पुन्हा आपल्या देशात आणि कुटुंबीयां जवळ पोहोचू शकू की नाही. मात्र योग्य वेळी मिळालेल्या मदतीमुळे सुरक्षितपणे घरी परतू शकली यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,ॲड आशिष जयस्वाल, मुकेश जिवतोडे विशेष कार्याधिकारी राहुल गेठे आणि श्रावण अभंग यांचे मनापासून आभार मानते. कठिण काळात मिळालेली ही मदत मी आयुष्यभर विसरणार नाही अशी भावनिक प्रतिक्रीया ज्योती दुपारे हिने व्यक्त केली.


0 टिप्पण्या