दिव्यांगांनी बांधवांनी कागदपत्रे सादर करावी
कागदपत्रे सादर न केल्यास शासनाकडून मिळणारे सर्व लाभ बंद होणार
चित्रा न्युज प्रतिनिधी
श्रीक्षेत्र माहूर :-माहूर तालुक्यातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी यु डी आय डी कार्ड, व आधार कार्ड 31 मार्च 2026 पर्यंत तहसील कार्यालयात सादर करावे अन्यथा लाभ बंद होणार असल्याने दिव्यांग लाभार्थ्यांनी सर्व कागदपत्रे सादर करावी असे आवाहन तहसीलदार अभीजीत जगताप यांनी केले आहे
विशेष सहाय्य विभागाअंतर्गत विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक दिव्यांग व्यक्तीचे युनिक डीसाबिलिटी आयडेंटी कार्ड तयार असणे आवश्यक आहे.त्या अनुषंगाने, ज्या उर्वरीत लाभार्थ्यांकडे यु डी आय डी कार्ड उपलब्ध आहे. परंतू आत्तापर्यंन्त कार्यालयात सादर केले नाही तसेच ज्या लाभार्थ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची मुदत संमलेली आहे, अशा लाभार्थ्यांनी दिव्यांग प्रमाणपत्राचे नुतणीकरण करुन त्यांनी आपल्या यु डी आय डी कार्ड आधार कार्ड ची प्रत दि. 31 मार्च 2026 पर्यंत माहूर तहसील कार्यालयात संगांयो विभागाकडे सादर करावी.तसेच ज्या लाभार्थ्यांनी अद्याप यु डी आय डी कार्ड काढलेले नाही त्यांनी तात्काळ ऑनलाईन अर्ज करून किंवा संबंधित शासकीय रुग्णालय अधिकृत वैद्यकीय मंडळाकडून यु डी आयडी कार्ड प्राप्त करून त्याची प्रत तहसील कार्यालयात जमा करावी.
निर्धारित मुदतीत यु डी आय डी कार्ड सादर न केल्यास शासनाच्या नियमानुसार संबंधित लाभार्थ्यांचा योजनेचा लाभ कायम स्थगित करण्यात येऊ शकतो संबंधित दिव्यांग लाभार्थ्यांनी याची नोंद घेऊन दि. ३१ मार्च २०२६ पूर्वी यु डी आय डी कार्डची प्रत तहसील कार्यालयात सादर करावी, ज्यांच्याकडे यु डी आय डी कार्ड नाही त्यांचे अनुदान बंद करण्यात येईल असे आवाहन तहसीलदार अभिजीत जगताप यानी केले आहे.


0 टिप्पण्या