महाराणा इन्स्टिट्यूट मधून नेत्र दीपक यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रशांत भाऊ राठोड यांनी केला सत्कार
काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आनंद तूपदाळे पाटील यांच्या घरी भेट दिल्याने चर्चांना उधान
चित्रा न्युज प्रतिनिधी
श्रीक्षेत्र माहूर :-मंत्रालयीन सनदी अधिकारी माहूर तालुक्याचे भूमिपुत्र प्रशांत भाऊ राठोड यांच्याकडून विविध परीक्षात नेत्र दीपक यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य सतत सुरू असून त्या अंतर्गत त्यांनी माहूर मधील दोन विद्यार्थ्यांनी महाराणा कम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट येथे शिक्षण घेत परीक्षात नेत्र दीपक यश मिळविल्याने त्यांच्या घरी जाऊन हृदय सत्कार केला त्यानंतर त्यांनी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे यांच्या घरी अचानक पणे भेट दिल्याने चर्चांना उधाण आले आहे
मंत्रालयिन सनदी अधिकारी प्रशांत भाऊ राठोड यांचे जनसेवेचे कार्य माहूर किनवट तालुक्यासह मुंबईलाही सुरू असून फावल्या वेळात विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन जीवन घडवावे यासाठी ते कुठल्याही परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करून पाठ थोपटत असतात माहूर शहरातील शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या महाराणा कम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट येथे तंत्र शिक्षण घेतलेले श्लोक गजानन शद्दलवार ओम प्रवीण राठोड या दोघांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करून पुढील शिक्षणात नेत्रदीपक यश मिळवे म्हणून त्यांना मार्गदर्शनही केले यानंतर त्यांनी काँग्रेसचे माहूर तालुका अध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे यांच्या घरी अचानकपणे भेट दिली यावेळी आनंद तूपदाळे पाटील यांचे सह परिवारातील सदस्यांनी त्यांचा सत्कार केला या भेटीमुळे राजकीय उलथापालीच्या चर्चांना उधान आले आहे
यावेळी प्रशांत भाऊ राठोड यांचे सोबत दत्तकृपा टी स्टॉलचे संचालक विजय कांबळे, एस एस पाटील कदिर बावाणी गजानन शद्दलवार, रवी वायकुळे, राजु पवार, बंडू राठोड, प्रदीप राठोड, श्याम जाधव, सुमित कळसकर जगदीश पाटील तुपदाळे, माहूर नगरपंचायतच्या माजी उपनगराध्यक्षा सौ.अश्विनी आनंद पाटील तुपदाळे, स्वराज जगदीश पाटील तुपदाळे करण गेडाम यांचे सह मान्यवर उपस्थित होते


0 टिप्पण्या