चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती / नितीन निकेतन बहुउद्देशीय शिक्षण संस्था पुणा व्दारा संचालित वाडेबोलाई माऊली बालकाश्रम येथे रविवार दि.८ मार्च २०२६ रोजी जागतिक महिला दिवस उत्साहात व थाटात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजामाता तसेच स्रियांना शिक्षणाची दारे उघडून देणा-या सावित्रीबाई फुले ,अहिल्याबाई होळकर व झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करून झाली .
या वेळी संस्थेच्या सचिव गोदावरी बसवराज दयाडे यांनी दीप प्रज्वलन केले.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी पुणे व निकेनिकेतन बहुउद्देशीय शिक्षण संस्था वाघोली यांच्या संयुक्त विद्यमानाने बेटी बचाव बेटी पढाव , मुलगी वाचवा मुलगी शिकवा ,शिक्षित मुलगी सक्षम समाज या जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन या निमित्ताने करण्यात आले होते.
कार्यक्रमांतर्गत महिला राजकारण व महिला पंचायत प्रतिनिधीशी संवाद साधून गावातील स्वयंसहायता बचत गट यांच्या सोबत प्रधानमंत्री मातृत्व योजना आदिं योजनेविषयी माहिती कार्यक्रमाच्या अनुषंगाने उपस्थितीतांना देण्यात आली .
मातृत्व आरोग्य जनजागृती कशा पद्धतीने केली पाहिजे याबाबत आरोग्य खात्याच्या आरोग्य सेविका तसेच गावातील समाजसेविका अनिता इंगळे यांनी माहिती दिली.
महिला बचत गटाच्या प्रतिनिधी व आरोग्य खात्यातील आशा वर्कर मनीषा भालेराव यांनी सदरहु कार्यक्रमास आपली उपस्थिती दर्शवली .अनिता राय यांनी सशक्त नारी याबद्दल महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले .
आयोजित कार्यक्रमाला संस्थेमधील सर्व कर्मचारी तसेच महिला बचत गटातील सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.जागतिक महिला दिनाच्या या कार्यक्रमात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.


0 टिप्पण्या