Ticker

6/recent/ticker-posts

जय जिवाजी क्रांती सेना महिला बचत गट, मारेगाव यांच्या वतीने जागतिक महिला दिवस उत्साहात साजरा

चित्रा न्युज प्रतिनिधी 
चंद्रपूर : दि. ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त जय जिवाजी क्रांती सेना महिला बचत गट, मारेगाव यांच्या वतीने महान समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमात महिलांच्या शिक्षण, स्वाभिमान आणि सक्षमीकरणासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या महान कार्याची आठवण करून देत त्यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प करण्यात आला. समाजात महिलांनी शिक्षण, स्वावलंबन आणि एकजुटीच्या बळावर प्रगती साधावी, असा संदेशही यावेळी देण्यात आला.
हा जय जिवाजी क्रांती सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष  गणेश वनकर (चंद्रपूर) यांच्या मार्गदर्शना खाली जय जिवाजी  महिला बचत गट अध्यक्षा  शिल्पा चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. तसेच महिला बचत गटाच्या सर्व सदस्यांनी उत्साहाने सहभाग घेत महिला दिन साजरा केला.
महिलांच्या एकजुटीमुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडू शकते, असा विश्वास व्यक्त करत सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या