चित्रा न्युज प्रतिनिधी
भंंडारा :-दर वर्षी प्रमाणे या वर्षी ही 15 ते 17 एप्रिल 2026 तीन दिवसीय व्याख्यानमाला चे आयोजन श्रीराम हनुमान मंदिर, सहकारनगर भंडारा येथे दर रोज सायंकाळी 6.00 वाजता करण्यात आले आहे.
15 एप्रिल 2026 बुधवार ला आयोजित कार्यक्रमाला वक्ते मा. आशुतोष अडोणी नागपूर राष्ट्रीय मंत्री, संस्कार भारती "वंद्य वंदे मातरम" विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
दि.16 एप्रिल 2026 रोजी वक्ते मा.सौ.स्नेहा सुनील शिनखेडे नागपूर लेखिका व निरुपणकार "शब्दांच्या गावा जावे" विषयावर बोलणार.
दि.17 एप्रिल 2026 रोजी वक्ते मा.सौ. स्नेहा सुनील शिनखेडे ,नागपुर ह्या "आद्य शंकराचार्य रचित जिव्हा प्रार्थना" या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.
तरी सर्वांनी या व्याख्यानमालेचे जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आह्वान संस्कार भारती च्या अध्यक्षा मा.सौ. चंदा मुरकुटे, कार्याध्यक्ष मा. श्री रामदास शहारे, मंत्री मा.श्री मोहन भाकरे यांनी केले आहे.


0 टिप्पण्या