Ticker

6/recent/ticker-posts

प्रबोधनकार भीम शाहिर तथा पत्रकार प्रदीप बागवान कडबे यांना " क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले समाज भूषण पुरस्कार -2026 नागपूर येथे सन्मानित.

चित्रा न्युज प्रतिनिधी 
नागपूर : राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले जयंती दि शताब्दी वर्ष 1827/2027,1927/2027 महाड जल सत्याग्रह शताब्दी उत्सव सत्यशोधक समाज, मानव अधिकार आ. टीम द्वारा आयोजित रजि. एनजीओ /712/ एमएच सत्यशोधक बहुउद्देशीय संस्था ( महाराष्ट्र राज्य ) समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचा जयंतीनिमित्त शनिवार दिनांक - 11 एप्रिल 2026 रोजी 4 वाजता केंद्रीय कार्यालय सत्यशोधक समाज मानव अधिकार, हावरे लेआउट जुनी वस्ती खामला नागपूर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश काळे ( राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय लोक कलाकार संघटना नागपूर ) होते. तर उद्घाटक म्हणून महा नाट्यकलावंत सुधीर पाटील यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून सप्त खंजिरी समाज प्रबोधनकार चेतन बेले, भिमशाहिर सदानंद मोरे अकोला, सामाजिक कार्यकर्त्या तथा गायिका  नीलकमल गोंडाने, निलेश कापसे, अभय रंगारी, किशोर बिहाडे, दिलीप फुल झे ले, रामदास गजभिये, प्रबोधनकार भीमशाही र तथा पत्रकार प्रदीप कडबे रामटेक, अनिल पारखी राष्ट्रीय सचिव ( भारतीय लोक कलाकार संघटना नागपूर ) शांता शेंडे, मंगला उईके, गणेश गायकवाड, कुणाल गायकवाड, कल्याणी गायकवाड, या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक - नागमित्र धर्मेश पाटील, सुरज शक्य  ( ऐतिहासिक कपिल वस्तू परिवार ) सुधीर पाटील( सम्राट अशोक सेना अध्यक्ष ) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांचा प्रतिमेचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी रामटेक तालुक्यातील किरणापूर येथील बुद्ध फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा बुलंद आवाज प्रबोधनकार भीम शाहीर तथा पत्रकार प्रदीप बागवान कडबे यांनी आपल्या गायनातून सांगितले - विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, विता विनाशुद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले, " शिक्षण हेच खरे शक्ती स्थान आहे, त्यांचा विचारांचा विशेष उल्लेख करण्यात आला. शेतकरी बहुजन समाज व महिलांचा शिक्षणासाठी त्यांनी दिलेले योगदान आजही प्रेरणादायी असल्याचे भीम शाहीर प्रदीप कडबे यांनी  सांगितले. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे क्रांतिकारी गीत सादरीकरण करून उपस्थिता ना मंत्रमुग्ध केले. सामाजिक कार्य, ग्रंथालय क्षेत्रातील, पत्रकारिती ल, आणि समाज प्रबोधन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल भीम शाहीर प्रदीप कडबे यांना सम्राट अशोक मेडल, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र,शाल, पेन, देऊन  " क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक - नागमित्र धर्मेश पाटील यांनी उपस्थिता चे आभार मानून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कलावंत समाजसेवक, समाज बांधव, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या