चित्रा न्युज प्रतिनिधी
नागपूर : साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे मजदूर काँग्रेस, बिलासपूर यांच्या पुढाकाराने दिनांक 9, 10 आणि 11 एप्रिल 2026 रोजी रेल्वे क्लब ऑडिटोरियम, बिलासपूर येथे यशस्वीरित्या पार पडले. या अधिवेशनात भारतीय रेल्वेच्या 17 झोनमधील हजारो पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.
दिनांक 9/4/2026 रोजी साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे मजदूर काँग्रेस, बिलासपूर झोनच्या कर्मचाऱ्यांनी श्री पीतांबर लक्ष्मीनारायण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नागपूर मंडळ समन्वयक श्री इंदल दमाहे यांच्या नेतृत्वात भव्य महारॅली काढून वर्किंग कमिटीमध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत केले तसेच महासभेचे आयोजन करण्यात आले.
सभेचे अध्यक्षस्थान श्री गुमान सिंह, अध्यक्ष नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन रेल्वेमेन, नवी दिल्ली यांनी भूषविले. मुख्य वक्ते म्हणून मजदूर नेते डॉ. एम. राघवैय्या, महामंत्री नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन रेल्वेमेन, नवी दिल्ली उपस्थित होते. तसेच मुख्य अतिथी म्हणून श्री तरुण प्रकाश (महाप्रबंधक, साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे, बिलासपूर), श्री आदित्य कुमार (मुख्य कार्मिक अधिकारी, बिलासपूर) आणि मंडल रेल प्रबंधक, बिलासपूर विशेषतः उपस्थित होते.
आपल्या भाषणात डॉ. एम. राघवैय्या यांनी केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांचा तीव्र निषेध केला. त्यांनी सांगितले की, मी गेल्या 60 वर्षांपासून रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सेवेसाठी कार्यरत आहे आणि रेल्वे कर्मचारी हेच माझे कुटुंब आहे. नवीन पेन्शन योजना लागू झाल्यावेळीही नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन रेल्वेमेन आणि संलग्न सर्व झोनल संघटनांनी तीव्र विरोध केला होता. मात्र कर्मचारीविरोधी सरकारने फसवणूक करून ती योजना लागू केली. जोपर्यंत जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू होत नाही, तोपर्यंत संघर्ष सुरू राहील. तसेच 8 व्या वेतन आयोगाचा सुधारित अहवाल लवकरात लवकर जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली.
इंजिनियरिंग विभागातील प्रलंबित मागणी ‘LDCE Open to All’ ला मान्यता देऊन रेल्वे बोर्डाने त्वरित परिपत्रक जारी करावे.
इंजिनियरिंग व रनिंग विभागातील महिला कर्मचाऱ्यांना इतर विभागात बदलीची परवानगी देण्याचे आदेश द्यावेत.
सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांना 8 व्या वेतन आयोगानुसार बोनस देण्यात यावा.
नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन रेल्वेमेनचे अध्यक्ष श्री गुमान सिंह यांनीही केंद्र सरकारच्या कर्मचारीविरोधी धोरणांवर टीका करत रेल्वेमधील खासगीकरणाला विरोध दर्शविला तसेच नव्या कामगार कायद्यांचाही निषेध केला.
सभेत महाप्रबंधक तरुण प्रकाश, मुख्य कार्मिक अधिकारी आदित्य कुमार आणि मंडल रेल प्रबंधक बिलासपूर यांनीही आपले विचार मांडले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री पीतांबर लक्ष्मीनारायण, महामंत्री साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे मजदूर काँग्रेस यांनी केले. त्यांनी बिलासपूर झोनमध्ये पुन्हा एकदा एकल मान्यता मिळवून देण्यासाठी कर्मचाऱ्यांनी दिलेल्या मतांच्या रूपातील आशीर्वादाबद्दल आभार मानले आणि 243 वी राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक बिलासपूर येथे आयोजित करण्यासाठी डॉ. एम. राघवैय्या यांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच इंजिनियरिंग विभागातील कर्मचाऱ्यांना 4200 ग्रेड पे देण्यात यावा, सर्व धोकादायक काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हार्ड रिस्क अलाउन्स द्यावा अशी मागणी त्यांनी केली.
मोतीबाग वर्कशॉप, नागपूर येथे 100 कोच क्षमतेसाठी विस्ताराचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे प्रलंबित असून तो लवकर मंजूर करून विस्तार करण्यात यावा आणि कर्मचाऱ्यांसाठी ग्रुप इंटेन्सिव पॉलिसी लागू करावी.
रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पालकांना वैद्यकीय सुविधा व प्रिव्हिलेज पासची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांकडे त्यांनी लक्ष वेधले.
या ऐतिहासिक अधिवेशनात दिलीप कुमार स्वाईन (अध्यक्ष, साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे मजदूर काँग्रेस), नागपूर मंडळ समन्वयक श्री इंदल दमाहे, रायपूर मंडळ समन्वयक श्री बी. डी. प्रसाद, बिलासपूर मंडळ समन्वयक विजय अग्निहोत्री हे आपल्या कार्यकर्त्यांसह उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन रवी धल, कार्यकारी अध्यक्ष साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे मजदूर काँग्रेस, बिलासपूर यांनी केले.


0 टिप्पण्या