चित्रा न्युज प्रतिनिधी
भंंडारा :-शब्द हे मनातील भावना व्यक्त करण्याचे साधन आहे,शब्द आपले जीवन आहे. परंतु शब्दांच्या पलीकडे जाऊन त्यातील भाव समजून घेणे म्हणजेच शब्दांचा खरा प्रभावी वापर होय. शब्द स्वभाव असतात, शब्द ऐकतच आपण लहानाचे मोठे होतो, शब्दाला भान असला पाहिजे, एका शब्दाने वाईट, चांगले परिणाम होतो. स्तुती हे साखरेच्या प्रमाणे गोड आहे. शब्दाला वजन असते.कौतुकाच्या शब्दाने आपण सुखावतो तर धारधार शब्द बाणांनी आपण दुखावतो देखील.शब्दा मुळे सामर्थ्य मिळते तर शब्दामुळे मन ही खचते .सोडलेला बाण आणि बोललेला शब्द मागे घेता येत नाही म्हणुन शब्द जपून वापरणे गरजेचे आहे.आपण जग सोडून जातो पण आपले शब्द स्मृति रूपाने जिवंत असतात अशा सुंदर व रसाळ शब्दात लेखिका व निरुपणकार सौ. स्नेहा सुनील शिनखेडे नागपूर यांनी विवेचन केले. संस्कार भारती भंडारा तर्फे श्रीराम हनुमान मंदिर, सहकार नगर येथे आयोजित वसंत व्याख्यानमालेत शब्दांच्या पलीकडे या विषययावर द्वितीय पुष्प गुंफताना प्रमुख वक्ते म्हणुन त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती मीरा सक्सेना,नगरसेविका श्रीमती कुलप्रीत चढा,संस्कार भारतीच्या अध्यक्षा सौ. चंदा मुरकुटे,श्री सुनील शिनखेडे,कार्याध्यक्ष श्री रामदास शहारे,सुमंत देशपांडे ,श्री दत्ता दाढ़ी,डॉ. सोबतच संस्कार भारतीचे मंत्री श्री मोहन भाकरे,सौ.नीता मलेवार,डॉ.प्रकाश मालगावे व इत्यादि मान्यवर उपस्थित होते.
सुरुवातीला दीप प्रज्वलन करण्यात आले, मान्यवर पाहुण्यांचे पुष्पगुच्छ ने स्वागत करण्यात आले.सूत्र संचालन अर्चनाताई पथ्ये तर आभार प्रदर्शन सारंग नखाते यांनी मानले.
17 एप्रिल रोजी अंतिम व्याख्यानमाला मध्ये वक्त्या मा.सौ.स्नेहा शिनखेडे यांनी आद्य शंकराचार्य रचित जिव्हा प्रार्थना विषयावर अंतिम पुष्प गुंफताना आद्य शंकराचार्य यांनी रचलेले जिव्हा भूषण स्त्रोत हे सरस्वती देवीला समर्पित एक अत्यंत प्रभावी स्त्रोत आहे. हे स्त्रोत जिभेच्या व वाणीच्या शुद्धीकरणासाठी, आणि ज्ञानाच्या प्राप्तीसाठी गायले जाते इत्यादि बाबत सखोल असे सुंदर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला अध्यक्ष सौ. रोशनीताई मनोज संघांनी तर प्रमुख अतिथी म्हणुन नगरसेविका लक्ष्मीताई अभय भागवत, संस्कार भारती च्या अध्यक्षा सौ.चंदाताई मुरकुटे,श्री सुमंत देशपांडे, श्री सुनील शिनखेडे ,श्री रामविलास सारडा, श्री दत्ताजी दाढी,श्री मोहन भाकरे, डॉ. प्रकाश मालगावे ,श्री विनोद पथे, सौ.अनघा चेपे ,मो.सईद शेख,केशव जोशी,व संस्कार भारतीचे पदाधिकारी,कार्यकर्ते इत्यादि सह अनेक गणमान्य,ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते. पसायदान वर्षा हाडगे यांनी गायिले.सूत्र संचालन सई देशपांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन मोहन भाकरे यांनी मानले.मंदिर समिति अध्यक्ष श्री घनश्याम कानतोड़े यांचे विशेष सहकार्य लाभले .


0 टिप्पण्या