Ticker

6/recent/ticker-posts

उत्तर जपानमध्ये 6.1 तीव्रतेचा भूकंप; नागरिकांमध्ये घबराट, नुकसानाची नोंद नाही

चित्रा न्युज ब्युरो 
टोकियो : उत्तर जपानमधील होक्काइडो परिसर सोमवारी पहाटे भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी हादरला. अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) च्या माहितीनुसार, रिश्टर स्केलवर 6.1 तीव्रतेचा हा भूकंप साराबेत्सु शहराच्या 18 किलोमीटर पश्चिमेला आणि सुमारे 81 किलोमीटर खोलीवर नोंदवण्यात आला.

पहाटे 5.24 वाजण्याच्या सुमारास झालेल्या या भूकंपामुळे अनेक भागांमध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. जोरदार धक्क्यांमुळे लोक घराबाहेर धावले. काही ठिकाणी घरातील वस्तू हलल्याच्या आणि पडल्याच्या घटना समोर आल्या.

सुरुवातीच्या अहवालांनुसार, या भूकंपात कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या नुकसानीची नोंद झालेली नाही. स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. भूकंपप्रवण देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जपानमध्ये अशा नैसर्गिक आपत्ती वारंवार घडत असतात. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या