अमेरिकन ग्लोबल रिपोर्टर व्हिलीयम व्ही याची सोनटक्के नैसर्गिक फर्मला भेट
चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-भारतामध्ये ADM मार्फत शाश्वत शेती व सेंद्रिय शेती कशा प्रकारे केली जाते यासाठी अमेरिकेहून ग्लोबलचे रिपोर्टर व्हिलीयम व्हि. हे लोहारा ता.उदगीर जि.लातूर येथील सोनटक्के नैसर्गिक शेतीला व सुभद्रा गोपालन केंद्रास भेट देऊन नैसर्गिक शेती मध्ये वापरत असलेल्या निविष्ठा बद्दल माहिती घेतली. सोबत ADM च्या व्यवस्थापिका श्रीमती अंजली रितू मॅडम तसेच शाश्वत शेतीचे समन्वयक श्री दयानंद माने तसेच आशिष सौदागर, विभीषण शिनगारे व कैलास भांगे व कृषिभूषण श्यामभाऊ सोनटक्के,वडील चंदरराव सोनटक्के परिवार उपस्थित होते.
यावेळी व्हिलीयम व्हि. यांनी श्री शामराव सोनटक्के व कृषी विभाग उदगीर यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन सदरील प्रकल्प अमेरिकेमध्ये मध्ये राबवू असे सांगितले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी श्री राजेश मूळजे उप कृषी अधिकारी सुनील चव्हाण हे उपस्थित होते.
श्री शामराव सोनटक्के यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले


0 टिप्पण्या