Ticker

6/recent/ticker-posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त अंधेरी येथे भव्य सोहळा


चित्रा न्युज प्रतिनिधी 

मुंबई : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्र, मुंबई यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मंगळवार, दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता अंधेरी (पश्चिम), चार बंगला येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी भवनातील सिद्धार्थ सभागृह (बँकेट) येथे पार पडणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयु. विजय जाधव हे असणार असून प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. भिमराव यशवंतराव आंबेडकर (कार्याध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा) उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ पत्रकार, संपादक व सामाजिक कार्यकर्ते आयु. ज्ञानेश महाराव यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

या जयंती सोहळ्यात डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार, सामाजिक समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांवर विशेष भर देण्यात येणार आहे.

सर्व नागरिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आत्मसात करावे, असे आवाहन संस्थेचे सरचिटणीस आयु. चंद्रकांत बच्छाव यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या