Ticker

6/recent/ticker-posts

लाखांदूर तालुक्यातील चप्राड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जुंबुदीप बुद्धविहाराचे उद्घाटन संपन्न


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा -लाखांदूर तालुक्यातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या१३५ व्या जयंतीनिमित्त दिनांक १३एप्रिल २०२६ ला सकाळी १० वाजता जंबुदीप बुद्ध विहाराचा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. या विहाराचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश  डोंगरे यांचे हस्ते करण्यात आले .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ.युवराज निजाम मेश्राम प्रोफेसर एन एच कॉलेज ब्रह्मपुरी हे होते. तर धम्मदेशना महामोगलायन  पेरणाभूमी महाविहार सावंगी, पूज्य भदंत दीपंकर श्रामनेर यांच्या उपस्थितीत देण्यात आली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे , मनोज बनसोड सामाजिक कार्यकर्ता लाखांदूर उपस्थित होते .तर प्रमुख पाहुणे म्हणून चप्राड येथील सरपंचा मंदाताई ढोरे, प्राध्यापक धनंजय ढवळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास जांभुळकर यांनी केले तर संचालन प्राध्यापक मोहन सांगोळे तर आभार सुमेध जांभुळकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता जम्बुदीप बुद्धविहाराचे अध्यक्ष मोहनलाल बनसोड ,चुनीलाल शहारे उपाध्यक्ष ,नंदकिशोर ढवळे सचिव, प्रशांत वासनिक सहसचिव, प्रीतम जांभुळकर कोषाध्यक्ष, पटवारी जनबंधू, साहित्य राऊत, निखिल मेश्राम, शुभम जांभुळकर, मिथुन वासनिक, पवित्र मेश्राम, कलाबाई मेश्राम ,प्रियंका मेश्राम ,तरुणा मेश्राम ,अस्मिता जांभुळकर ,शालुबाई जांभुळकर, किरण जांभुळकर, मीनाक्षी बडोले, किरण सहारे, हिराबाई सहारे व समस्त बौद्ध समाज कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या