चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली :-शहरातील नामांकित 'नवजीवन विद्यालय अँड ज्युनिअर सायन्स कॉलेज जमनापूर साकोली' येथे आगामी शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रवेशपूर्व परीक्षेला विद्यार्थी आणि पालकांचा उदंड प्रतिसाद लाभला. रविवारी पार पडलेल्या या परीक्षेला तब्बल २४० विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावून शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी उत्सुकता दर्शवली.
दर्जेदार शिक्षण, शिस्त आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवजीवन विद्यालय ओळखले जाते. त्यामुळे दरवर्षी या शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळते. यावर्षीही प्रवेशासाठी मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले होते. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेची आणि गुणवत्तेची योग्य चाचपणी करण्यासाठी या विशेष प्रवेशपूर्व परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
नियोजनबद्ध आणि शांततेत पार पडली परीक्षा परीक्षा केंद्रावर सकाळपासूनच विद्यार्थी आणि पालकांनी मोठी गर्दी केली होती. विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी शाळा प्रशासनातर्फे चोख व्यवस्था करण्यात आली होती. पिण्याचे पाणी, सुसज्ज बैठक व्यवस्था आणि पालकांसाठी शाळेच्या सभागृहात पालक सभेचे आयोजन करण्यात आली होते. शिक्षकांच्या आणि स्वयंसेवकांच्या मदतीने संपूर्ण परीक्षा अत्यंत शांततेत आणि नियोजनबद्ध वातावरणात पार पडली.
पालकांचा शाळेवर विश्वास या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल बोलताना विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. लोकानंद नवखरे म्हणाले, "आमच्या शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेवर आणि मूल्यांवर पालकांनी जो विश्वास दाखवला आहे, त्याचीच पोचपावती या प्रतिसादातून मिळते. आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला उत्तम शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहोत." यावेळी उपस्थित पालकांनीही शाळेच्या शिस्तबद्ध नियोजनाचे आणि पारदर्शक प्रवेश प्रक्रियेचे कौतुक केले.
या परीक्षेचा निकाल २० एप्रिल २०२६ ला जाहीर होणार आहे. या प्रवेशपूर्व परीक्षेचा निकाल २० एप्रिल २०२६ ला विद्यालयाच्या सूचना फलकावर, पालकांच्या whatsup ग्रुपवर आणि शाळेच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल आणि त्यानंतरच पुढील प्रवेश प्रक्रिया पार पडेल, अशी माहितीही देण्यात आली आहे.
सदर परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक *डॉ. लोकानंद नवखरे* यांच्या मार्गदर्शनाखाली चोख नियोजन करण्यात आले होते. परीक्षा सनियंत्रक *मुकेश येसनसुरे* यांनी संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवली.
ही परीक्षा यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यामध्ये प्रामुख्याने शिक्षक वृंद प्रकाश बडवाईक, अमोल वाकडे, दीपक गहाणे, शैलेश ठवरे, योगराज मस्के, मुरलीधर घोरमारे, घनश्याम विठ्ठले, अर्चना नवखरे, अल्का गोंधळे, प्रीती साखरे, पायल नेवारे, ललिता खोटेले, कविता शिवणकर, प्रतीक्षा बोरकर, निकिता खंडाईत. भूमिता लंजे, लता लंजे
तसेच शिक्षकेतर कर्मचारी मुनिश्वर करंजेकर, आशिष डुंभरे, राकेश चकोले, सुरज नंदेश्वर, हेमराज सयाम, प्रमोद डोंगरवार यांचे सहकार्य लाभले.


0 टिप्पण्या