परतवाडा शहरात तरुणी व काही महिलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली अप्रोपी परिवाराश फरार आहे.
चित्रा न्युज प्रतिनिधी
अमरावती :-जिल्ह्यातील परतवाडा येथील एकाविशिष्ठ समाजाचे युवकाने तरुणीना प्रेम जाळ्यात अडकवून त्याचे अश्लील व्हिडिओ इंस्टाग्राम व टेलिग्रामवर प्रसारित केल्याचा आरोप असून, यामुळे
शहरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर व्हिडिओमध्ये परतवाडा शहरातील गटरमलपूरा येथील अयाज नामक युवक तरुणी व महिलांसोबत अश्लील कृत्य करताना दिसत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तसेच या प्रकरणात एकटाच
नव्हे तर इतर काही युवकही सहभागी असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकारामुळे पीडित मुली व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेविरोधात शहरातील महिलांनी एकत्र येत
उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शुभम कुमार व उपविभागीय राजस्व अधिकारी बळवंत अरखराव यांना
निवेदन देत तात्काळ कारवाईची मागणी केली. आरोपींना अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, आमदार प्रवीण तायडे
यांनी थेट एसडीपीओ कार्यालयात धडक देत पोलिसांना जाब विचारला. अद्याप आरोपींना ताब्यात का घेण्यात आले नाही, अशी विचारणा करत त्यांनी तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलिसांकडून तक्रार नसल्याचे सांगितले जात असताना आमदारांनी
स्वतःची तक्रार नोंदवून घेण्याचा आग्रह धरत संताप व्यक्त केला. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीच्या नेता सुरेखाताई ठाकरे, भाजपा नगरसेवीका पदमिणी बेंडे, सौ. अपर्णा जितेंद्र रोडे, वैशाली पोटे, शिला साखरे, जिजाऊ बिग्रेड, भाजपा महिला पदाधिकारी, सर्व पक्षीय महिलांनी या प्रकरणी संताप व्यक्त केला. सध्या या प्रकरणामुळे अचलपूर परतवाडा शहरात संतापजनक वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी लवकरात लवकर
कठोर कारवाई करावी, अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे...


0 टिप्पण्या