Ticker

6/recent/ticker-posts

रवि भोंगाने यांची नियुक्ती


चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली :-माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियान अंतर्गत साकोली येथील पत्रकार रवि भोंगाने यांची सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ," माझे गाव आरोग्य संपन्न गाव "  अभियान सुरू आहे. रवि भोंगाने यांची सामाजिक कार्यातील योगदान आणि पर्यावरण क्षेत्रातील अतुल्य कामगिरी याची दखल घेऊन या अभियानात त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या पूर्वी रवि भोंगाने यांना भंडारा जिल्हा तंटामुक्त गाव अभियान अंतर्गत जिल्ह्याचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळालेले होते. त्यानंतर शामरावबापू कापगते प्रतिष्ठान अंतर्गत वनश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २६ जानेवारी रोजी भंडारा येथे राज्यमंत्री यांच्या हस्ते पर्यावरणात उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या या नियुक्तीबद्दल साकोली व्हाईस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष आशिष चेडगे त्यांचे संपूर्ण पदाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रुपेश बडवाईक आणि त्यांची संपूर्ण चमू आणि वैद्यकीय मदत प्रमुख सचिन घोनमोडे यांनी अभिनंदन केलेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या