'हायटेक' जिल्हा परिषद केंद्र शाळा साकोलीत अभिनव आयोजन
रवि भोंगाने चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली : इयत्ता पहिलीत येणाऱ्या चिमुकल्यांच्या पावलांना कुंकू लावून त्यांची पावले शुभ्र कागदावर चिन्हीत करण्यात आली. आणि त्यांच्या शुभ पावलांनी हा प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला. हे अभिनव आयोजन ( मंगळ. २८ एप्रिल ) ला आजची हायटेक भरारी घेतलेली जिल्हा परिषद केंद्र उच्च प्राथ. शाळा क्र. १ ( सेमी इंग्लिश ) गणेश वार्ड साकोलीत झाले. येथे शहरातील प्रतिष्ठित व शिक्षित जनतेने सुद्धा आपल्या पाल्यांना याच शासकीय शाळेत प्रवेश करून "उच्च शिक्षण शासकीय शिक्षण" याची प्रचिती करून दाखविली हे महत्त्वाचे.
इशाळा प्रवेश सोहळ्याला अतिथी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हेमंत भारद्वाज, मुख्याध्यापक सेवकराम हटवार, सदस्य भागवत लांजेवार, आशिष चेडगे, पालक समिर गहाणे हे उपस्थित होते. येथे उपक्रमशील शिक्षिका शालिनी राऊत यांनी इयत्ता पहिलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या पावलांना कुंकू लावून त्यांची पदे चिन्हीत केली. आणि ती शुभ पावले शाळेच्या दर्शनीय भागात लावली जातील अशी घोषणा करण्यात आली. या सोहळ्याला शिक्षक टी. आय. पटले, पद. शिक्षक चेतन बोरकर, डी. आर. माहूरे, शिक्षिका चित्ररेखा इंगळे, श्रद्धा गवळी, सुनिता गहाणे, आरती कापगते यांनी प्रवेशोत्सव प्रक्रियेत कार्य पार पाडले. याप्रसंगी साकोली शहरातील अनेक प्रतिष्ठित जनतेने आपल्या मुलांना या शासकीय सेमी इंग्लिश शाळेत प्रवेश करूवून "उच्च शिक्षण शासकीय जिल्हा परिषद शिक्षण" याची प्रचिती घडवून आणली. याप्रसंगी शाळेत प्रवेश करतांना चिमुकल्यांच्या चेह-यांवर या अभिनव उपक्रमामुळे मात्र आश्चर्य आणि तेवढाच आनंद झळकत होता. येथे सर्व पालक जनतेचे शाळा व्यवस्थापन समिती व शाळा प्रशासनातर्फे स्वागत करण्यात आले. संचालन टी. आय. पटले यांनी केले तर आभार शिक्षिका शालिनी राऊत यांनी मानले. यशस्वीतेसाठी शालेय पोषण आहाराचे रेषमा कोवे, कविता बावणे व छन्नू मडावी यांनी सहकार्य केले.


0 टिप्पण्या